शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बेभान अशिलांचा न्यायमंदिरावर अन्याय

By admin | Updated: February 5, 2016 01:56 IST

न्याय मागण्यासाठी येणारी हजारो गरीब माणसे नकळत जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरच अन्याय करीत आहेत.

सामान्यांची गुन्हेगारी : जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत पानाच्या पिचकाऱ्यायवतमाळ : न्याय मागण्यासाठी येणारी हजारो गरीब माणसे नकळत जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरच अन्याय करीत आहेत. गुटखाबंदी असतानाही तो चघळला जात आहे. खर्रा आणि पानाच्या पिचकाऱ्यांनी न्यायमंदिराच्या भिंती भेसूर झाल्या आहेत. यात अशील, पक्षकारांसह काही वकील आणि न्यायालयीन शिपायांचाही हातभार लागत आहे. इतरांचे निवाडे करणारी ही इमारतच एकप्रकारचा अत्याचार सोसत आहे.जिल्ह्यात गुटख्यावर बंदी असली तरी खुद्द जिल्हा न्यायालयाच्या परिसरात गुटख्याच्या पुड्या सर्वत्र विखुरलेल्या दिसतात. न्यायमंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच हा कचरा दिसू लागतो. साधारण १९८७-९० या काळात उभी राहिलेली जिल्हा न्यायालयाची इमारत टोलेजंग आहे. पण या देखण्या इमारतीचे पावित्र आणि गांभीर्य राखण्याबाबत प्रशासन गाफील दिसते. या तीन मजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील मूत्रीघर घाण आहे. जेथे नामवंत वकील मंडळी बसतात, त्या कक्षाच्या भिंती तर बसस्थानकाच्या भिंतींप्रमाणे लालेलाल झाल्या आहेत. पानाच्या बेसुमार पिचकाऱ्या मारल्या गेलेल्या आहेत. चक्क वकीलांच्या पुढेही मोबाईलवर बोलत बोलत ‘अन्यायग्रस्त’ नागरिक या भिंतींवर पिचकाऱ्या मारत आहेत. पहिल्या मजल्यावरील कक्ष क्रमांक १४, १५, १९ यांच्या भिंतीच काय दारेही पिचकाऱ्यांनी रंगलेली आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अपराध ठरतो, बंदी असताना गुटखा खाणे अपराध ठरतो. पण या सर्व बाबी चक्क न्यायालयाच्या इमारतीतच घडत आहेत. ‘चौकशी कार्यालय’ अशी पाटी लावलेल्या बंद दारावर पानाच्या पिचकाऱ्यांची नक्षी झालेली आहे. विशेष म्हणजे, आरोपींना ‘पेशी’साठी घेऊन आलेले पोलीस जेथे बसतात, त्या हॉलच्या भिंतीही पिचकाऱ्यांपासून सुटलेल्या नाहीत. या हॉलच्या खिडक्यांच्या तावदानांची ‘आरोपीं’नींच रंगरंगोटी करून टाकली आहे. या सर्व वातावरणामुळे न्यायालयाच्या इमारतीत बसस्थानक, दवाखान्याच्या परिसराप्रमाणे दुर्गंधी पसरली आहे. न्यायालयाच्या इमारतीत व परिसरात धुम्रपान आणि तंबाखूसेवनास कडक बंदी आहे. त्यासंबंधीच्या सूचना सर्वत्र ठळक अक्षरात लावण्यात आल्या आहेत. पण जेथे या सूचना आहे, त्याखालीच थुंकण्यात आल्याचे विचित्र पण वास्तव चित्र आहे. पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या जागीच मोठ्या प्रमाणात थुंकून ठेवण्यात आले आहे. अन्यायग्रस्तांना न्याय देणाऱ्या न्यायदेवतेवरच हे अन्यायग्रस्त अत्याचार करीत आहेत. न्यायालय प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)