शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: November 1, 2014 23:13 IST

उद्योगांमध्ये औद्योगिक सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. यासाठी उद्योग खात्याने नियमावली ठरवून दिली आहे. परंतु या नियमावलीचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. कामगारांना जोखीम

चोरीच्या घटनांमध्ये वाढ : कामगारही करतात जोखीम स्वीकारून कामसुहास सुपासे - यवतमाळ उद्योगांमध्ये औद्योगिक सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. यासाठी उद्योग खात्याने नियमावली ठरवून दिली आहे. परंतु या नियमावलीचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. कामगारांना जोखीम स्वीकारून आपले काम करावे लागते. यवतमाळ शहरात दोन औद्योगिक वसाहती आहेत. यातील अंतर्गत कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि मालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही सबंधित उद्योजकांकडेच असते. त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात शासनाची नियमावली आहे. त्यानुसार कामगारांसाठी काम करण्यास पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने त्यांच्यासाठी जेवणाची जागा, स्वच्छ पाणी, शौचालय सोबतच जोखीमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांसाठी आवश्यक तो विमा आणि प्रत्यक्ष उद्योगामध्ये सुविधा आवश्यक आहे. यातील बहुतांश सोयीसुविधांची पूर्तता यवतमाळसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या एमआयडीसीमधील उद्योगांमध्ये होत असल्या तरी जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतींची मात्र खस्ता हालत आहे. वणीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग असताना त्या ठिकाणी मात्र कामगारांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने आवश्यक ते नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबत कर्मचाऱ्यांमध्येही एकजुटतेचा अभाव आणि स्वत:च्या सुरक्षिततेविषयी असलेली अनभिज्ञता कारणीभूत आहे. त्यामुळे इथे कामगारांच्या अपघातांची संख्यासुद्धा मोठी आहे. यवतमाळच्या औद्योगिक वसाहतीमध्ये चोरीच्या घटना मात्र नित्याच्याच झाल्या आहेत. तयार मालाची व इतर साहित्याच्या चोऱ्या या ठिकाणी नेहमीच होतात. उल्लेखनिय म्हणजे या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. अनेकवेळा जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदने देण्यात आली आहेत. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर आजपर्यंत एकाही चोरीचा छडा लावण्यात आला नसल्याची माहिती एमआयडीसीचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा यांनी दिली. यावर विचार होणे आवश्यक आहे. याबाबत एमआयडीसी कार्यालयाशी संपर्क साधला असता, आम्ही उद्योगांना केवळ जागा, विद्युत व पाणी उपलब्ध करून देतो. इतर बाबींशी आमचा काहीएक सबंध नसल्याचे सांगण्यात आले. उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची तसेच मालाची सुरक्षितता स्वत:च करायची असल्याचे एमआयडीसी कार्यालयाचे म्हणणे आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलीस चौकी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आली आहे. परंतु ही चौकी उभारण्यात आल्यानंतर चोरींच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाल्याचा आरोप उद्योजकांमधून करण्यात येत आहे. या चौकीचा फारसा उपयोग चोऱ्या रोखण्यात होतच नसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने पोलीस खात्याने विचार करण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरातील मोठे उद्योजक स्वत:च्या मालाची व कर्मचाऱ्यांची सुरक्षा स्वत: करण्यास सक्षम असतात. परंतु छोट्या उद्योजकांची मात्र चांगलीच कसरत होते. त्यादृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.