शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

इंद्रायणी काठी लागली समाधी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 05:00 IST

बाबूजींच्या २४ व्या स्मृतिदिनािनिमित्त लोकमत सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्या दोन गायकांनी आगळीवेगळी स्वरांजली अर्पण केली. पंजाबी संगीताचा बाज घेऊन अमृतसरहून आलेल्या हरगुण कौर यांनी   सुरुवातीला डोक्यावर पदर घेऊन सादर केलेली प्रार्थना श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारी होती. तर पुढे कंबरेला पदर खोचून त्यांनी एकापेक्षा एक दणकेबाज सुफी गीतरचना सादर केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘इंद्रायणी काठीदेवाची आळंदीलागली समाधीज्ञानेशाची...’अशा अभंगांनी बुधवारची सायंकाळ यवतमाळकरांसाठी रम्य ठरली. निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहाचे. बाबूजींची समाधी असलेल्या प्रेरणास्थळावर ही संगीतमय स्वरांजली रंगली. बाबूजींच्या समाधीभोवती झुळझुळणारे कृत्रिम सरोवर, त्यात कोसळणारा कृत्रिम धबधबा अन् त्याच पाण्यात उभारलेल्या मंचावर प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि प्रसिद्ध गायिका हरगुण कौर यांचे गायन. बाबूजींच्या समाधीच्या सानिध्यात बसलेले हजारो श्रोते ‘इंद्रायणी काठी लागली समाधी’ हा अभंग ऐकताना इतके तल्लीन झाले जणू समाधी लागली.बाबूजींच्या २४ व्या स्मृतिदिनािनिमित्त लोकमत सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्या दोन गायकांनी आगळीवेगळी स्वरांजली अर्पण केली. पंजाबी संगीताचा बाज घेऊन अमृतसरहून आलेल्या हरगुण कौर यांनी   सुरुवातीला डोक्यावर पदर घेऊन सादर केलेली प्रार्थना श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारी होती. तर पुढे कंबरेला पदर खोचून त्यांनी एकापेक्षा एक दणकेबाज सुफी गीतरचना सादर केल्या. ‘मंगदा नसिबा कुछ और है... किस्मत पे किसका जोर है’ याच गाण्याचा धागा धरून त्यांनी लगेच ‘मिले हो तूम हम को, बडे नसिबो से’ आणि याच गाण्यातून पुन्हा ‘तेरी गलिया मुझको भावे’ अशी चमत्कृतीपूर्ण पेशकश केली.हरगुण यांनी हळूच श्रोत्यांशी संवाद साधत आलाप घेतला आणि हे कोणते गाणे असा प्रश्न समोरच्या गर्दीला विचारला. गर्दीतून एकमुखी आवाज उमटला ‘एक हसीना थी, एक दिवाना था’... मग हरगुणच्या पहाडी स्वरात हे गाणे दणाणत असताना श्रोते अक्षरश: आपल्या मोबाईलचे दिवे पेटवून हात उंचावून डोलू लागले.तर दुसरीकडे मराठी मातीचा शास्त्रीय सुगंध लेऊन प्रथमेश        लघाटे यांनी नाट्यपद, अभंग,    भावगीत सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. एकदंताय वक्रतुंडाय हे गणेशस्तवन, सुरत पिया की दिन बिसराई, घेई छंद मकरंद हे नाट्यपद लक्षवेधी ठरले.‘बाजे रे मुरलीया बाजे अधर धरे मोहन मुरलीधरओठ पर माया बिराजे’या भजनाने तर प्रथमेशने यवतमाळकरांना जिंकूनच घेतले. मात्र जेव्हा कानडा राजा पंढरीचा या अभंगाची आळवणी सुरू झाली तेव्हा मैफलीत अनोखा रंग चढला. तब्बल तीन तास रंगलेल्या या मैफिलीचे सूत्रसंचालन प्रा. अजय आकोलकर यांनी केले.

विठ्ठल विठ्ठल ते अली अली- संगीत ही संपूर्ण जगाला कळणारी भाषा आहे. जाती, धर्म बाजूला ठेवून आराधनेचा मार्ग आहे. याचाच प्रत्यय स्वरांजली कार्यक्रमात आला. प्रथमेश लघाटे यांनी माझे माहेर पंढरी, कानडा राजा पंढरीचा सारखे अभंग गाताना विठ्ठलाची आळवणी केली. तर हरगुण कौर यांनी आजा रे माही तेरा रस्ता वो देख दिया, दमा दम मस्त कलंदर अशा सूफी रचना पेश करताना ‘अली अली’ अशी आळवणी केली. या दोन्ही वेळेस यवतमाळकर प्रेक्षक सारख्याच तन्मयतेने गाण्याशी एकरूप झाले. हरगुण कौर यांच्या आवाजात अस्सल मराठी लोकगीत असलेला ‘आईचा गोंधळ’ ऐकताना मैफलीची उंच आणखी वाढली.

कलावंतांचा सन्मान- मैफिलीच्या प्रारंभी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, सुनित कोठारी, किशोर दर्डा, पूर्वा कोठारी, सीमा दर्डा यांच्यासह गायक प्रथमेश लघाटे व हरगुण कौर तसेच त्यांच्या मातोश्री रवींद्रजी कौर यांनी प्रेरणास्थळावर दीपप्रज्वलन केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या समाधीपुढे नतमस्तक झाल्यानंतर स्वरांजली कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी गायिका हरगुण कौर यांच्या आई रवींद्रजी कौर यांचे पूर्वा सुनित कोठारी यांनी स्वागत केले. तसेच दोन्ही गायक व त्यांच्यासोबत असलेले वाद्यवृंद नंदू गोहणे, राजू गजभिये, रितेश तिवारी, रॉबीन विल्यम, श्रीधर कोरडे, प्रशांत नागमोते, रवी खंडारे, नरेंद्र कडवे, मयूर पटारी, स्मीत वंजारी यांचा किशोर दर्डा यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

 

टॅग्स :Prerna Sthalप्रेरणास्थळ