शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

१०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रूग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:25 IST

शहराच्या मध्यवस्तीतील जुन्या महिला रूग्णालय परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रूग्णालय निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने १८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला.

ठळक मुद्दे१८ कोटी मंजूर : जिल्हा शल्य चिकित्सकांची राहणार देखरेख

रूपेश उत्तरवार।ऑनलाईन लोकमत यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीतील जुन्या महिला रूग्णालय परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रूग्णालय निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने १८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. बांधकामाच्या निविदा निघाल्या असून बांधकामाला सुरूवातही झाली आहे.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर जिल्ह्यातील रूग्णांच्या सेवेसाठी अपुरा ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवीन स्त्री आणि नवजात शिशू रूग्णालय उभारले जात आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जुन्या स्त्री रूग्णालयाची विस्तीर्ण जागा नवीन स्त्री रूग्णालयासाठी वापरली जात आहे. या परिसरात भव्य तीन मजली इमारत बांधली जात आहे. या रूग्णालयात महिलांच्या सर्व शस्त्रक्रियेपासून ते बालकांवरील सर्व उपचाराची सुविधा उपलब्ध राहणार आहे. नवीन स्त्री आणि नवजात शिशू रूग्णालयासाठी राज्य शासनाने १८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून बांधकामाच्या निविदा काढण्यात आल्या. नवीन वास्तूच्या बांधकामाला सुरूवातही झाली आहे. नागपूरच्या मेसर्स सादीक अ‍ॅन्ड कंपनीकडे बांधकाम सोपविण्यात आले आहे.शासकीय रूग्णालयावर पडणारा ताण कमी करण्यासाठी या नव्या स्वतंत्र स्त्री रूग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील प्रसूती आणि महिलांच्या शस्त्रक्रियांचा भार कमी होणार आहे. सोबतच बालकांच्या आरोग्याची जबाबदारीही नवीन स्त्री रूग्णालयावर राहणार आहे. नवीन वास्तूत खालील मजल्यावर सर्व प्रकारची शासकीय कार्यालये राहतील. तेथे कॉन्फरन्स हॉल असणार आहे. औषधांची व्यवस्थाही वास्तूतच राहणार आहे. अद्ययावत पद्धतीने उभारल्या जाणाºया या रूग्णालयामुळे महिला रूग्णांची गैरसोय टळणार आहे.२०१९ पर्यंत पूर्णनागपूरच्या बांधकाम कंपनीसोबत शासनाने मार्च २०१९ पर्यंत रूग्णालयाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचा करार केला आहे. बांधकाम कंपनीने सध्या प्रत्यक्षात वास्तू बांधकामाला सुरूवात केली आहे. मार्च २०१९ पर्यंत वास्तूचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कंपनीने हालचाल सुरू केली आहे.