शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांमध्ये वाढतोय ताणतणाव, उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:22 IST

दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी बाबींमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढतो आहे. त्यांच्या जीवनात उदासीनता व नैराश्य आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा निष्कर्ष टाटा ट्रस्टने गेली तीन वर्ष जिल्ह्यात केलेल्या अभ्यासवजा पाहणीतून काढला आहे.

ठळक मुद्देटाटा ट्रस्टचा अहवाल : संकटातून बाहेर काढण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हवे

काशीनाथ लाहोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी बाबींमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढतो आहे. त्यांच्या जीवनात उदासीनता व नैराश्य आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा निष्कर्ष टाटा ट्रस्टने गेली तीन वर्ष जिल्ह्यात केलेल्या अभ्यासवजा पाहणीतून काढला आहे.शेतकरी आत्महत्यांमुळे यवतमाळ जिल्हा देशातच नव्हे तर जगात चर्चेत आहेत. या आत्महत्या केंद्र व राज्यातील सरकार आणि प्रशासनासाठीही चिंतेचा विषय ठरल्या आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा देशातील एकमेव प्रकल्प टाटा ट्रस्टच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात सुरू करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील घाटंजी व यवतमाळ तालुक्यातील ६४ गावांमध्ये हा प्रकल्प राबविला गेला. त्यावर विविध उपाययोजनांसाठी दीड कोटी रुपये खर्च केले गेले. त्याचे चांगले परिणाम दिसायला लागल्याने आता राळेगाव व केळापूर या आणखी दोन तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टने शासनाला दिला आहे. या माध्यमातून चार तालुक्यातील ४५० गावांमध्ये टाटा ट्रस्ट पोहोचणार आहे.गेली तीन वर्ष टाटा ट्रस्टच्या चमूने घाटंजी व यवतमाळ तालुक्यात शेतकरी आत्महत्यांवर बरेच काम केले. त्यातूनच अनेक गंभीरबाबी पुढे आल्या. नैराश्य व ताण-तणावाने ग्रस्त शेतकºयांना या बिकट प्रसंगी धीर देण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुळापासून सखोल व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याची आवश्कता टाटा ट्रस्टने नोंदविली आहे. शेतकºयांसाठी विदर्भ मनोसामाजिक समूपदेशन व काळजी कार्यक्रम राबविला गेला. बैठक, चर्चा, मेळावे, गावांना नियमित भेटी, सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, उपचार, लोकचळवळ या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या गेल्या. आता त्यांच्या पुनर्वसनावर जोर दिला जाणार आहे.२५ हजार नागरिकांची चाचणीगेल्या तीन वर्षात टाटा ट्रस्टने ६४ गावातील २५ हजार नागरिकांची चाचणी केली. त्यांच्यातील तणावाचे स्त्री-पुरुषांचे प्रमाण समान असल्याचे आढळून आले. १३५० नागरिकांची मनोरुग्ण म्हणून नोंद केली गेली असून उपचार करण्यात येत आहे. यातील ६५० नागरिकांचे नैराश्य दूर करण्यात यश आल्याचे टाटा ट्रस्टने सांगितले. त्यातील २०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला. १२० नागरिकांना केम प्रकल्पातून शेळ्या खरेदीसाठी अनुदान दिले गेले. त्याकरिता प्रशिक्षण देण्यात आले.शेतकरी व त्यांच्या कुटुंबांचे नैराश्य दूर करून त्यांना मानसिक आधार देण्यात, रोजगार निर्मिती, पुनर्वसन, उपचार उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. आता त्यांच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. हाच प्रकल्प आणखी दोन तालुक्यांमध्ये राबविण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.- डॉ. प्रफुल्ल कापसेप्रकल्प संचालक, टाटा ट्रस्ट