शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीवरून नेत्यांची वाढली डोकेदुखी

By admin | Updated: January 25, 2017 00:39 IST

सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे.

जिल्हा परिषद : उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग पुसद : सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी पुसद तालुक्यातील गट व गणासाठी पक्षांतर्गत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपली प्रतिष्ठा व तुल्यबळ दाखवून आपली उमेदवारी फिक्स करण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. केवळ उमेदवारी मागणी झाली असून अद्यापपर्यंत कुणालाही तिकीट घोषित झाले नाही. परंतु नागरिकांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. पक्ष कोणाची उमेदवारी निश्चित करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुक उमेदवार झाल्याने मतदारांच्या संपर्कात येत आहेत. मात्र अद्यापपर्यंत युती आघाडी झाली नसून इच्छुक उमेदवारीचे बाशिंग बांधून बसले जरी असले तरी पण बोहल्यावर कोण बसेल याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र गत जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत विकासाच्या आराखड्यानुसार समाधानकारक विकास झाला नाही. फक्त आश्वासनाचा भडिमार कामे मात्र कमी असून रस्ते, पाणी व मूलभूत योजनेपासून मतदार वंचित आहे. सुशिक्षित नागरिक व तरुण वर्गात विकास कामांची चर्चा, उच्च शिक्षित तरुण वर्गातील उमेदवार दिल्यास राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रवर्गातील प्रभावी उमेदवाराच्या शोधात पक्ष आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मतदार व राजकीय पक्ष सद्यस्थितीत उमेदवारीवरून इच्छुकांची भलीमोठी यादी असूनही गोंधळात पडल्याचे चित्र दिसून येत आहे. गट-गणामधील विजय प्रतिष्ठेचा झाल्यामुळे सत्ताधारी, विरोधी पक्ष, नेते, प्रमुख राजकीय पक्षांचे पुढारी यांचा उमेदवारी शोधता शोधता चांगलाच कस लागत आहे. सध्यातरी उमेदवारी कोणाला निश्चित होते व कोण बाजी मारून जातो, याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडोबा आपली वेगळी चूल मांडून शकतात. यामुळेही पक्ष प्रमुख चिंतेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)