शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तेलाच्या मागणीत वाढ, पेरणीक्षेत्रात घट; जिल्ह्यात भुईमुगाचा पेरा निम्म्याने घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

रबी हंगाम आणि उन्हाळ्यात करडई, सूर्यफुल, भुईमूग, तीळ आणि मोहरी ही प्रमुख पिके घेतली जातात. विविध अडचणी निर्माण झाल्याने करडई आणि सूर्यफुल दोन्ही पिके नाहीशी झाली आहेत. आता मोहरी, तीळ आणि भुईमूग या पिकांना पहिली पसंती आहे. ही पिके घेताना भुईमुगावर सर्वाधिक भर आहे. मात्र, जंगली जनावरांना हे पीक सर्वाधिक आवडीचे आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कितीही सुरक्षा केली तरी रानडुकर या शेतामध्ये प्रवेश करतात.

ठळक मुद्देजिल्ह्यातील तेल पिकांच्या उत्पादनात घट ; रबीचे क्षेत्र वाढले, वन्यप्राण्यांमुळे चित्र बदलले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरिपाच्या तुलनेत रबी आणि उन्हाळी पिके घेण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी या पिकामधून प्रयत्न होतो. मात्र, जंगली जनावरे, वीज भारनियमन आणि चांगला भाव न मिळणे या प्रमुख कारणाने तेलबियांच्या क्षेत्रात जिल्ह्यात घट झाली आहे. रबी हंगाम आणि उन्हाळ्यात करडई, सूर्यफुल, भुईमूग, तीळ आणि मोहरी ही प्रमुख पिके घेतली जातात. विविध अडचणी निर्माण झाल्याने करडई आणि सूर्यफुल दोन्ही पिके नाहीशी झाली आहेत. आता मोहरी, तीळ आणि भुईमूग या पिकांना पहिली पसंती आहे. ही पिके घेताना भुईमुगावर सर्वाधिक भर आहे. मात्र, जंगली जनावरांना हे पीक सर्वाधिक आवडीचे आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कितीही सुरक्षा केली तरी रानडुकर या शेतामध्ये प्रवेश करतात. संपूर्ण शेतच उद्ध्वस्त करतात. लावलेला खर्चही निघत नाही. याला पर्याय म्हणून शेतकरी रबीच्या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. गहू, हरभरा या पिकांच्या माध्यमातून शेतात उत्पादन काढण्यासाठी त्यांचा सर्वाधिक भर आहे. तर, उन्हाळी पिकामध्ये तेलबियांसाठी पाहिजे त्या प्रमाणात लागवड होत नाही. उन्हाळ्यात पाणी पुरेल किंवा नाही याचाही प्रश्न अनेकांकडे असतो. शिवाय, इतरत्र पीक नसल्याने उन्हाळ्यात हिरवळ असणाऱ्या भागात वन्यप्राण्यांचा आणि मोकाट जनावरांचा धुमाकूळ असतो. यातून तेलबियांचे क्षेत्र कमी झाले आहे.

जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकरी पीक घेण्यासाठी तयार आहेत. मात्र, वन्यप्राण्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे तेलबिया पेरताना शेतकरी आखडता हात घेतात. तेलबियांचा उत्पादनखर्चही वाढला आहे. मिळणारा भाव कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर रबीच्या पिकाकडे वाढला आहे. यातूनच जिल्ह्यातील तेलबियांचे क्षेत्र घटले आहे.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

करडई, सूर्यफुल हद्दपारतेलबिया म्हणून करडईची पूर्वी मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. हे पीक काढणी करताना अतिशय जोखमीचे आहे. यामध्ये हाताला इजा होते. अलीकडे मजुरांना सुविधा असेल तरच कामावर जाण्याची परंपरा वाढली आहे. यामुळे करडईचे पीक कालबाह्य झाले आहे. तर सूर्यफुल पिकावर पक्ष्यांचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होते. खाण्यासाठी अन्न म्हणून पक्षी मोठ्या प्रमाणात या शेतशिवारात शिरतात. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो. या पिकाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यामुळे तेलबियांचे वाण म्हणून ओळखले जाणारे ही दोनही पिके जिल्ह्यातून हद्दपार झाली आहेत.

तेलबिया लागवड करताना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धोका वाढला आहे. याशिवाय भारनियमनाचाही प्रश्न आहे. यामुळे पाणी उपलब्ध असले तरी ओलीत करता येत नाही. याशिवाय शेतमालास चांगला दरही मिळत नाही. तेलबियांचे पीक घेताना रात्री जागल करावी लागते. जंगली जनावरे रखवाली करणाऱ्यांवर धावून येतात. यामुळे शेतकऱ्यांनी तेलबियांचे पीक कमी केले आहे.- मनीष जाधव, शेतकरी, महागाव

 

टॅग्स :agricultureशेती