शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मतदान प्रक्रियेत नागरिकांचा विश्वास वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:16 IST

लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे. आगामी निवडणुकात जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे हे शासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय कार्यालये, सामाजिक संघटना आणि इतर महामंडळांच्या आस्थापनेवर मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे. आगामी निवडणुकात जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे हे शासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय कार्यालये, सामाजिक संघटना आणि इतर महामंडळांच्या आस्थापनेवर मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. मतदार जागरुकता मंचच्या माध्यमातून नागरिकांचा मतदान प्रक्रियेत विश्वास वाढवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय बेले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर आदी उपस्थित होते.जिल्हा प्रशासनातर्फे मतदान पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात घरोघरी मतदारांच्या भेटी, नवमतदारांना ओळखपत्र वाटप, दिव्यांग मतदारांची नोंदणी, महिला बचत गट व माविमच्या माध्यमातून महिला मतदारांची नोंदणी आदींचा समावेश आहे, असे यावेळी सांगण्यात आले. सर्व यंत्रणेसह जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांपर्यंत पोहचून मतदान प्रक्रियेत इतरांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक