शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

व्यापाऱ्यांवर आयकर विभागाची नजर

By admin | Updated: October 22, 2014 23:25 IST

धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला नागपूर आणि वर्धा येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने यवतमाळात दोन सराफा दुकानांचा सर्च घेतला. या कारवाईला दोन दिवस उलटत नसतानाच बुधवारी

यवतमाळ : धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला नागपूर आणि वर्धा येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने यवतमाळात दोन सराफा दुकानांचा सर्च घेतला. या कारवाईला दोन दिवस उलटत नसतानाच बुधवारी आयकर विभागाचा एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचे पथक यवतमाळात येवून गेले. यावेळी त्यांनी आयकर चुकवत असल्याचा संशय असलेल्या काही प्रतिष्ठानांची आणि त्यांच्या घराच्या पत्त्यांची शहानिशा केल्याचे सांगण्यात आले. सध्या दिवाळीची बाजारात धूम आहे. या कालावधीत व्यवसाय तेजीत असतो. दैनंदिन व्यवसाय कमी दाखवून आयकरची चोरी केली जाते. त्यावर आयकर विभागाची करडी नजर असते. मात्र व्यावसायिक स्पर्धेतूनही बरेचदा तक्रारी केल्या जातात. बाजारपेठेत गर्दी असल्याची नेमकी संधी साधून आयकर विभागानेही कारवायांचा सपाटा चालविला आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला यवतमाळातील सराफा बाजारात नागपूर आणि वर्धेच्या संयुक्त पथकाने दोन दुकानांचा सर्च घेतला. त्यामध्ये शाह आभूषण आणि शाह ज्वेलर्स या दोन प्रतिष्ठानांचा समावेश होता. आता ही कारवाई झाल्यानंतर पथक इकडे फिरकणार नाही अशी भाबडी आशा व्यावसायिकांना होती. मात्र ऐन सणासुदीच्या काळातही आयकर विभाग कमालीचा सक्रिय आहे. बुधवारी सकाळी एक अधिकारी आणि दोन कर्मचारी यांचे पथक यवतमाळात काही प्रतिष्ठानांच्या पाहणीसाठी आले होते.यावेळी संबंधित व्यावसायिकांची नावे त्यांच्या दुकानांचा आणि घराचा पत्ता याची खातरजमा करण्यात आली. त्यामुळे काही काळ बाजारात विविध चर्चेला उधाण आले होते. आता नंबर कुणाचा अशी धास्ती बहुतांश व्यावसायिकांना आहे. त्यामुळे ग्राहकांच्या भाऊगर्दीतही एक डोळा व्यावसायिकांना बाहेर ठेवावा लागत आहे. आयकर विभागाने रेकी केल्याने कुठल्याही क्षणी पुन्हा यवतमाळात सर्च होवू शकतो, असे संकेत प्राप्त झाले आहे. या संदर्भात स्थानिक आयकर विभागाशी संपर्क केला असता त्यांनी खासगीत बोलताना त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)