शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पोटच्या लेकरांना विहिरीत ढकलून महिलेची आत्महत्या, दिग्रस तालुक्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:25 IST

दिग्रस ( यवतमाळ ) : तालुक्यातील मांडवा येथे माहेरी आलेल्या विवाहितेने पोटच्या दोन गोळ्यांना विहिरीत ढकलून स्वत: सुद्धा आत्महत्या ...

दिग्रस (यवतमाळ) : तालुक्यातील मांडवा येथे माहेरी आलेल्या विवाहितेने पोटच्या दोन गोळ्यांना विहिरीत ढकलून स्वत: सुद्धा आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

कल्पना अंकुश राठोड (२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या सोबतच युवराज अंकुश राठोड (५) आणि गुड्डी अंकुश राठोड (३) ही दोन चिमुकलीही मृत पावली आहे.  कल्पना राठोड ही मांडवा येथील माहेरवासीन आहे. दारव्हा तालुक्यातील हातनी येथील अंकुश राठोड यांच्याशी तिचा विवाह झाला होता. दोन मुले झाल्यानंतर तिला सासरच्यांनी पैशासाठी त्रास देणे सुरू केल्याचे सांगितले जाते. अशातच काही महिन्यांपूर्वी कल्पनाच्या आईला पैसे मिळाले होते. त्यापैकी काही पैसे घेऊन ये म्हणून सासरच्यांनी तिच्या मागे तगादा लावला होता. याच तगाद्यातून ती माहेरी मांडवा येथे आली होती. 

दरम्यान सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून कल्पनाने शुक्रवारी टोकाचे पाऊल उचलले. शुक्रवारी सकाळी मुलगी गुड्डी व मुलगा युवराज या दोघांना घेऊन कल्पना आईच्या घरातून बाहेर पडली. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ती गावालगतच्या गणेश म्हात्रे यांच्या शेतातील विहिरीजवळ पोहोचली. तिने प्रथम दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कल्पनाने स्वत: विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पोलीस पाटील व सरपंच पंकज चव्हाण यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार भगत पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढूृन उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात पतीसह इतरांचा समावेश आहे. दारव्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ