शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

‘जेडीआयईटी’त ‘स्फिलाटा-१५’ चे उद्घाटन

By admin | Updated: March 13, 2015 02:30 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिनिअरींग टेक्सटाईल विभागाच्यावतीने ‘स्फिलाटा-१५’ या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी उत्साहात करण्यात आले.

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिनिअरींग टेक्सटाईल विभागाच्यावतीने ‘स्फिलाटा-१५’ या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी उत्साहात करण्यात आले. या अंतर्गत फॅशन शो, टेक्सटाईल इंजिनिअरींगच्या विविध विषयावर राष्ट्रीय परिसंवाद, गारमेंट व अ‍ॅसेसरीज डिझाईनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला टेक्सटाईल असोसिएशन इंडियाचे सेक्रेटरी हेमंत सोनारे, जॉर्इंट सेक्रेटरी आर.के. मिश्रा, लातूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा.पी.आर.येतवाडे, नाशिकचे प्रा.एन.वाय. गोंडाणे, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, टेक्सटाईल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, स्फिलाटाचे समन्वयक प्रा. अजय राठोड, विद्यार्थी प्रतिनिधी दर्शन गुरनुले आणि विजयकुमार उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर विविध स्पर्धांना सुरुवात झाली. ११ वाजता पेपर प्रेझेंटेशनचे सत्र तसेच गारमेंट व अ‍ॅसेसरीज डिझाईनिंग या स्पर्धेच्या प्रदर्शनाचे दालन खुले करण्यात आले. त्यानंतर दुपारी २ वाजता आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या फॅशन शोला प्रारंभ झाला. देशातील ३५ महाविद्यालयातील विविध ६०० च्यावर स्पर्धकांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या विषयांवर आधारित स्वत: डिझाईन केलेले व स्पर्धेसाठी खास बनविलेल्या पोषाख व पेहरावांचे प्रदर्शन केले. कार्यक्रमात यमुनानगर (हरियाना), कोर्इंबतूर (तामिळनाडू), मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नांदेड, नागपूर, इचलकरंजी, अमरावती, अकोला, चिखली इत्यादी शहरातून व राज्यातून स्पर्धक सहभागी झाले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. टेक्सोरा-१५ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आयोजनासाठी संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. सुजित गुल्हाने, प्रा. दीपक उबरहंडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले, अनंत इंगळकर, शाम केळकर, प्रीतम रामटेके, अमोल गुल्हाने, विनय चवरे, हिमांशू सांडे, सागर शोळूके, उमेश पाटील, कल्याणी यादव, वैष्णवी आडे, श्रद्धा दुधे, काजल कडू, उदिता भारद्वाज, सुरज खुसवाह, गजानन कदम, दीपाली राठोड, पूजा महल्ले यांनी परिश्रम घेतले. संचालन सुरभी परळीकर यांनी तर आभार दर्शन गुरनुले यांनी मानले. या फॅशन शोला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. (नगर प्रतिनिधी)