शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

फुले-आंबेडकर समता पर्वाचे उद्घाटन

By admin | Updated: April 9, 2016 02:46 IST

महात्मा ज्योतिबा फुले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्व २०१६ चे गुरुवारी सायंकाळी

समता मैदान : विविध मनोरंजन, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने गर्दी खेचलीयवतमाळ : महात्मा ज्योतिबा फुले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्व २०१६ चे गुरुवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून थाटात उद्घाटन पार पडले. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, समाजकल्याण उपायुक्त विजय साळवे, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, दीपक नगराळे, अशोक वानखेडे, ज्ञानेश्वर गोरे, डॉ. दिलीप घावडे, प्रा.बाळकृष्ण सरकटे, डॉ.सुभाष जमदाडे, प्रमोदिनी रामटेके, डॉ.स्मिता गवई, उज्ज्वला इंगोले, अरविंद कुडमेथे, कवडू नगराळे, अंकुश वाकडे, अमृत निखाडे, अनिल आडे आदी उपस्थित होते. प्रारंभी ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मालिकेतील कलावंतांनी विविध मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला. भरगच्च भरलेल्या प्रेक्षागारांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमृता हिने भीमगीत सादर केले. अभिजित कोसंबी याने ‘दलितांचा राजा भीमराव माझा’ हे गीत सादर करून जनमानसात चैतन्य आणले. त्यानंतर हास्य अभिनेते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडगोळीने प्रासंगिक विनोदांनी रसिकांना हसत ठेवले. ‘गौरव महाराष्ट्र’ फेम धनश्री देशपांडे हिने भुलभुलैया चित्रपटातील गाण्याने सर्वांना धुंद केले. धनश्री दळवी आणि मेघा या जोडीने ‘मला लागली कुणाची उचकी’, ‘मै कोल्हापुर से आयी हु’ इत्यादी गाण्यांवर नृत्याविष्कार केला. विदर्भाचा कलावंत भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांनी ‘भाई’ होण्याची पात्रता विषद केली. बाजीराव मस्तानी चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या गाण्यातील अदाकारीने रसिकांना प्रफुल्लीत केले. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांनी ‘विद्यार्थी आणि शिक्षक’ हे नाट्य सादर केले. भारत आणि सागर यांनी वधू-वर सूचक मंडळ बंद केल्यानंतर सेकंडहॅन्ड गाड्या विकण्याचा धंदा सुरू केल्यावरची धमाल सांगितली. यवतमाळातील कलावंत अजिंक्य सोनटक्के याने गिटारच्या माध्यमातून फ्यूजन सादर केले. त्यानंतर अभिजित कोसंबी यांच्या आणि धनश्रीच्या गाण्याने या हास्य मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा शेवट झाला. पहिल्याच दिवशी या कार्यक्रमाने गर्दीचा उच्चांक नोंदविला. बसण्यास खुर्च्या कमी पडल्याने अनेकांनी उभे राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. (सांस्कृतिक प्रतिनिधी)