शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

उमरखेडमध्ये स्वयंचलित कापूस प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन

By admin | Updated: March 16, 2017 01:02 IST

तालुका शेतकरी जिनिंग व प्रेसिंग संस्थेत उभारण्यात आलेल्या स्वयंचलित कापूस प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन आमदार राजेंद्र नजरधने

उमरखेड : तालुका शेतकरी जिनिंग व प्रेसिंग संस्थेत उभारण्यात आलेल्या स्वयंचलित कापूस प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन आमदार राजेंद्र नजरधने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुरेशचंद्र माहेश्वरी होते. प्रमुख पाहुणे आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार विजय खडसे, माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, नंदकिशोर अग्रवाल, उत्तराव शिंदे, नारायणदास भट्टड उपस्थित होते. शेतकरी विकासाला गती देण्यासाठी कापूस प्रक्रिया उद्योग त्यासह पूरक उद्योग सुरू करण्यासाठी नवीन संचालक मंडळाने पुढाकार घेतला. संस्थेच्या भागभांडवल बळावर एक कोटी रुपयाची गुंतवणूक करून कापूस प्रक्रिया स्वयंचलित यंत्रणा सुरू करण्यात आली. या उद्योगामुळे गुणवत्ताधारक कापूस पिलाई गाठी तयार होणार असून बाजारपेठेत त्याला मागणी वाढेल, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनंतराव कदम यांनी सांगितले. यावेळी भीमराव चंद्रवंशी, महेश काळेश्वरकर, बाळासाहेब नाईक, सतीश वानखेडे, बाळासाहेब चंद्रे, किसन वानखेडे, दिलीप नरवाडे, प्रेमराव वानखेडे, इनायतुल्ला जनाब, जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, बळवंत नाईक, अ‍ॅड.बळीराम मुटकुळे, सहकार अधिकारी भागानगरे, विलास मोरे, खविसंचे उपाध्यक्ष नारायण मोरे, आत्माराम शिंदे, सविता कदम, छाया धूळध्वज, रक्षा माने, सभापती प्रयाग कोत्तेवार, संगीता वानखेडे, बाळासाहेब आगलावे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संस्था उपाध्यक्ष डॉ.भगवान देवसरकर, मानद सचिव हरिभाऊ दिल्लेवार, दीपक जोशी, सर्व संचालकांनी परिश्रम घेतले. संचालन वसंत चव्हाण यांनी, तर आभार बापुराव धुळे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)