शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम टाके नसल्याने विसर्जन वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:18 IST

यवतमाळ शहरातील प्रभाग ५ मध्ये येणाऱ्या आदर्शनगरात घडला. नगरपरिषदेने शहरात ३० कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन केले. दरवर्षीच कृत्रिम टाके व विहीर सफाईच्या नावाने निधी लाटला जातो. यावर्षीसुद्धा बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होवूनही कुठेच कृत्रिम टाके दिसत नाही.

ठळक मुद्देआदर्शनगरच्या मैदानात ठेवल्या गणेश मूर्ती : यवतमाळ पालिकेचा गलथान कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनासाठी कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र नगरपरिषदेने दहा दिवस उलटूनही कोणतीच कार्यवाही केली नाही. अखेर पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी जागाच न मिळाल्याने एका भक्ताने चक्क बाप्पाला खुल्या मैदानात ठेवून दिले.यवतमाळ शहरातील प्रभाग ५ मध्ये येणाऱ्या आदर्शनगरात घडला. नगरपरिषदेने शहरात ३० कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन केले. दरवर्षीच कृत्रिम टाके व विहीर सफाईच्या नावाने निधी लाटला जातो. यावर्षीसुद्धा बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होवूनही कुठेच कृत्रिम टाके दिसत नाही. प्रभाग ५ मध्ये आदर्शनगरच्या खुल्या मैदानात आणि संजय गांधी शाळेत कृत्रिम टाके प्रस्तावित होते. या प्रभागातील सार्वजनिक विहिरींवर गणपती विसर्जनाला पूर्णत: बंदी आहे. तेथील पाण्याचा नागरिक पिण्यासाठी वापर करतात. त्यामुळे बाप्पाचे विसर्जन करायचे कुठे हा प्रश्न घेऊन अनेकजण प्रभागाच्या नगरसेवक वैशाली सवाई यांच्याकडे पोहोचले. त्यांनीसुद्धा कृत्रिम टाके नसल्याने असमर्थता दर्शविली. अखेर एकाने गणपती बाप्पाची मूर्ती खुल्या मैदानातच ठेवून दिली. या गंभीर प्रकारामुळे संताप निर्माण झाला आहे. नगरपरिषद प्रशासन कोणतेच काम वेळेत करताना दिसत नाही.गणपतीची स्थापना ही दीड दिवस, अडीच दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस अशा प्रकारे केली जाते. आपल्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या बाप्पाचे विसर्जन भक्त त्यांच्या सोयीने करतात. यामुळे गणपतीची स्थापना होण्यापूर्वीच नगरपरिषदेने कृत्रिम टाके व इतर विसर्जनाच्या सोयींचे नियोजन करणे अपेक्षित होते. भ्रष्ट कारभारामुळे केवळ कागदोपत्री काम करण्यात तरबेज असलेल्या यंत्रणेने ही समस्या निर्माण केल्याचा आरोप प्रभागाच्या नगरसेवक वैशाली सवाई यांनी केला आहे. यापूर्वीसुद्धा विसर्जनाबाबत तातडीने उपाययोजना कराव्या, अशी वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव