शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

खैरी-नांदेपेरा मार्गाची दुरवस्था, बांधकामचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 18, 2015 02:17 IST

राज्य मार्गावरील खैरी ते नांदेपेरा या दरम्यान ठिकठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

मार्डी : राज्य मार्गावरील खैरी ते नांदेपेरा या दरम्यान ठिकठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगावअंतर्गत या मार्गाची देखभाल, दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रस्तावित कामेसुद्धा सुरू करण्यास उदासिनता दिसून येत आहे. यामुळे प्रवासी, वाहन चालकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. बांधकाम उपविभाग वणीअंतर्गत वणी ते नांदेपेरा दरम्यान आठ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे रूंदीकरण, नुतनीकरण झाले आहे. जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेल्या फलकावर मात्र १० किलोमीटर लांबीचा मार्ग दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग नांदेपेरापर्यंत दुरूस्त होवू शकला नाही. तो अर्धवट मार्ग पूर्ण होणे अपेक्षित आहे. नांदेपेरा गावापुढे मारेगाव उपविभागाची हद्द सुरू होते. त्यापुढे मार्डी-दापोरा-खैरी दरम्यान काही टप्पे वगळता रस्त्याची एवढी दुरवस्था झाली, की, वाहन चालकांना खड्डे टाळणे अशक्य झाले आहे. या मार्गे अवजड वाहतूक करणारे ट्रक, एस.टी., आॅटो या सर्व वाहन चालकांना तसेच दुचाकी चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच रस्त्यांच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडूपे, फांद्या रस्त्यावर आल्यामुळे वाहन चालकांना वाहन ओलांडताना काटेरी फांद्यामुळे ईजा, दुखापत होते. यावर बांधकाम विभागाकडून उपाययोजना होणे आवश्यक आहे. दापोरा ते खैरी दरम्यान ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळते. चिंचमंडळ येथील नाल्यावर एक महिन्यापूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे काटेरी कचरा, झुडूपे पाईपमध्ये अडकलेली आहे. त्याचीही विल्हेवाट लावण्यास दुर्लक्ष होत आहे. प्रवासी आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झाडा-झुडुपांच्या फांद्या तोडणे, खड्डे आहेत तेथे तात्पुरती दुरूस्ती करून काहिसा दिलासा द्यावा व या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण नव्याने व्हावे, अशी जनतेची मागणी आहे. राळेगाव बांधकाम उपविभागाअंतर्गत राळेगाव ते खैरी टप्पा सुव्यवस्थित आहे. मात्र मारेगाव उपविभाग या कामात माघारलेला दिसून येत आहे. (वार्ताहर)