शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सागवान अवैध कत्तलीतील वनपालास अभय

By admin | Updated: August 30, 2014 02:09 IST

येथील वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दहेगाव बीटमध्ये झालेल्या अवैध सागवान कत्तलीचा ठपका तीन कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला.

घाटंजी : येथील वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दहेगाव बीटमध्ये झालेल्या अवैध सागवान कत्तलीचा ठपका तीन कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला. मात्र दोघांवरच निलंबनाची कारवाई झाली. यातील वनक्षेत्र सहायकाला अभय देत पद्धतशिरपणे कारवाईतून वगळण्यात आले आहे. याची तक्रार मुख्य वनसंरक्षकांकडे एका निवेदनातून करण्यात आली.दहेगाव बिटमध्ये अवैध सागवान तोड झाल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली. त्यांचे आदेशानुसार संरक्षण व अतिक्रमण निर्मूलनचे वनपाल एस.जी. लाभसेटवार यांनी कक्ष क्र.२५०, २४६, २५१ मध्ये पाहणी केली असता त्यांना अवैध थुटाचे वनरक्षकांनी ड्रेसिंग केलेले आढळले. (परवानगी न घेता उंच थुटे तोडून कापण्यात आली, सात थुटाची भेंडी करण्यात आली. १४ थुटे वनरक्षकाने अवैध तोड झालेल्या मालाची चौकशी करून कोणत्याही प्रकारचा माल हस्तगत करण्याचा प्रयत्न केला नाही. बिट वनरक्षक व वनमजूर यांनी बिट संरक्षणाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. तसेच क्षेत्र सहाय्यक यांनीसुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. असा या तिघांवर ठपका ठेवीत अहवाल वरिष्ठांना पाठविला. त्या अहवालावरून केवळ वनमजूर व वनरक्षक यांचेवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले. मात्र चौकशी अहवालामध्ये समप्रमाणात ठपका असलेल्या वनक्षेत्र सहाय्यकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यांचेवरसुद्धा कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनकर मानकर यांनी मुख्य वनसंरक्षक यांचेकडे एका निवेदनातून केली आहे. येथे बोटावर मोजण्याइतक्या थुटावरून दोघांना निलंबित केल्या जाते. तर अनेक ठिकाणी सागवानाची मोठी कत्तल होते. त्यांचेवरसुद्धा वन विभागाने कडक कारवाई करावी, अशी जनमानसात मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)