पांढरकवडा : येथील वनविभागाचे फिरते पथक व मारेगाव परिक्षेत्राच्या पथकाने करंजी येथील विक्की फर्नीचर मार्ट आणि सराटी ता़मारेगाव येथे सोमवारी टाकलेल्या आकस्मिक धाडीत अवैध सागवान हस्तगत केले़फिरत्या पथकाला अवैध सागवानाबाबत माहिती मिळाली. पथकाने सहायक वनसंरक्षक ए़आऱ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली करंजी येथील विक्की फर्नीचर मार्टवर सोमवारी धाड टाकली. तेथे त्यांना अवैध सागवान आढळले. त्यानंतर पथकाने दुकान चालक विवेक नरांजे रा़सराटी यांच्या राहत्या घरी मारेगाव परिक्षेत्रातील पथकासह धाड टाकली़ तेथे नऊ सागवान गोल अवैधरीत्या साठवून ठेवल्याचे आढळून आले़ सखोल चौकशीत चोरीच्या सागवान लाकडाची खरेदी करून त्यापासून फर्निचर तयार करून विकण्याचा व्यवसाय नरांजे करीत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी विवेक नरांजे (३०) याच्याविरूद्ध भारतीय वन अधिनियमन १९२७ चे कलम २६ (१), ५२ आणि भादंवि १८६० चे कलम ४१३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येऊन अटक केली़ प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक ए़आऱसातपुते यांच्या नेतृत्वाखाली वन परीक्षेत्राधिकारी एऩआऱराऊत, व्ही़जी़वारे, वनरक्षक बोरेकर, मोहिते, बडे, मेंडके, कनाके, धानारकर, मस्के, मेश्राम, मुंडाले व वाहन चालक चेतन घाटे यांनी सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)
अवैध सागवान जप्त
By admin | Updated: July 30, 2015 02:19 IST