शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील प्रतिष्ठितांना घरुनच करायचा अवैध दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:00 IST

यवतमाळ शहरात बनावट ई-वाहतूक पासचा गोरखधंदा सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने स्टींग ऑपरेशन करून उघडकीस आणला. त्याआधारे सायबर गुन्हे शाखेने यातील मुख्य सूत्रधार प्रतीक भड याच्या  मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली गेली. न्यायालयात उपस्थित केले गेले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ठळक मुद्देबनावट ई-वाहतूक पास प्रकरणातील आरोपीची कबुली : पाच दिवसांची पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना तपासणीचे बनावट निगेटिव्ह प्रमाणपत्र व त्याआधारे आंतरजिल्हा प्रवासासाठी बनावट ई-वाहतूक पास बनवून ३०० ते ५०० रुपयात विक्री करणाऱ्या आरोपी प्रतीक भड याला न्यायालयाने १७ मेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रतीक हा कळंब रोडवरील एका ढाब्यावर काम करीत होता व त्यातूनच त्याने लॉकडाऊन काळात दारू आणून घरातूनच त्याची विक्री सुरू केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यवतमाळ शहरात बनावट ई-वाहतूक पासचा गोरखधंदा सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने स्टींग ऑपरेशन करून उघडकीस आणला. त्याआधारे सायबर गुन्हे शाखेने यातील मुख्य सूत्रधार प्रतीक भड याच्या  मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली गेली. न्यायालयात उपस्थित केले गेले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपासादरम्यान अनेक गंभीर बाबी उघड झाल्या. गेल्या वर्षी सायबर गुन्हे शाखेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला काही वाहतूक पास जारी करण्यात आले होते. त्यातील ओरिजनल तीन पासची पीडीएफ एडिट करून प्रतीकने अनेक बनावट ई-पास व कोरोना निगेटिव्ह, पॉझिटिव्ह प्रमाणपत्र बनविले. पोलिसांनी त्याच्या मोबाइलमधून काही पास व प्रमाणपत्र जप्तही केल्या. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आपण हे काम सुरू केले असून अवघ्या २० ते २५ पासच विकल्याचे प्रतीक पोलिसांना सांगत आहे. त्यात खरोखरच कितपत तथ्य आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. किरायाने घेतले सायबर सेंटरबहुतांश पास तो मोबाइलवरून करायचा. मात्र नेटवर्कची अडचण असेल तर तेव्हा तो आपल्या गोधनी रोड स्थित स्वस्तिक चौक परिसरातील सायबर सेंटरमधील डेस्कटॉपचा वापर करायचा. हे सायबर सेंटर त्याने भाड्याने घेतले आहे. हे सेंटर त्याच्या दिवंगत मित्राचे आहे. या सेंटरमधून तो फार्म भरून देणे, ऑनलाइन कामे करीत होता. परंतु लॉकडाऊनमुळे हे सायबर सेंटर बंद आहे. तेथील केवळ एक संगणक सुरू असल्याचेही पोलिसांच्या पाहणीत आढळून आले. आरोपीचा बनाव पोलिसांनी उधळलाप्रतीकच्या घरातून ३३ हजार रुपये किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली. तेव्हा ही दारू स्वत:च्या वापरासाठी आणल्याचे त्याने सांगितले. परंतु नंतर त्याने ही दारू आपण लॉकडाऊन काळात घरूनच विकत असल्याचे कबूल केले.  विशेष असे प्रतीकच्या घरून दारू नेणाऱ्यांमध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. कळंब रोडवरील ढाब्यावर काम करायचा आरोपी- प्रतीक हा कळंब रोडवरील एका ढाब्यावरही काम करायचा. त्या कनेक्शनमधून प्रतीकने ही दारू आणली का, त्याचा नेमका पुरवठादार कोण, आणलेली ही दारू वैध की अवैध याचाही शोध पोलीस घेत आहेत. - प्रतीकच्या या बनावट ई-पास गोरखधंद्यात आतापर्यंत तरी इतर कुणाचा सहभाग नसल्याचे दिसून आले. मात्र कुणी तरी त्याच्या संपर्कात असावे असा संशय पोलिसांना आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी