शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पूस नदीपात्र, धरणाच्या भिंतीजवळ रेतीचा अवैध उपसा जोरात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 05:00 IST

सध्या नदीला पाणी नाही. पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चिखली कॅम्प येथे धरणाच्या भिंतीपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर रेती तस्कर नदीपात्रात अवैध उपसा करीत आहेत. सोबतच काळ्या मातीचासुद्धा उपसा सुरू आहे. परिणामी नदीकाठावरील परिसरात पाणीपातळी खालावली आहे. नदीत ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे जीवितहानीची शक्यता वाढली आहे. नदीपात्रातून चार जेसीबी, आठ ट्रॅक्टर, दोन टिप्परने रेतीचा अवैध उपसा केला जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची डोळेझाक : चार जेसीबी, आठ ट्रॅक्टर, दोन टिप्परने वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातून वाहणाऱ्या पूस नदीपात्रातून दिवसरात्र रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे चिखली कॅम्प येथे पूस धरणाच्या भिंतीपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर वाळू उपसा सुरू आहे. सध्या नदीला पाणी नाही. पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चिखली कॅम्प येथे धरणाच्या भिंतीपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर रेती तस्कर नदीपात्रात अवैध उपसा करीत आहेत. सोबतच काळ्या मातीचासुद्धा उपसा सुरू आहे. परिणामी नदीकाठावरील परिसरात पाणीपातळी खालावली आहे. नदीत ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे जीवितहानीची शक्यता वाढली आहे. नदीपात्रातून चार जेसीबी, आठ ट्रॅक्टर, दोन टिप्परने रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. जेसीबीच्या साहाय्याने खुलेआम हा उपसा होत आहे. नदीपात्रात १५ ते २० फूट खोल खड्डे झाले आहे. चिखली कॅम्प व वडगाव परिसरातील नागरिक आणि प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वडगाव शिवारात अवैध वीटभट्टीही सुरू आहे. वीटभट्टीधारकांनी गाैण खनिजाचे उत्खनन केले आहे. याकडे उत्खनन विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. वीटभट्टीधारकाने जवळपास ५० लाख विटा तयार होतील एवढ्या काळ्या मातीचे उत्खनन केल्याचे सांगितले जाते. रेती माफियांनी चिखली कॅम्प व वडगाव परिसरात अक्षरशा धुडगूस घातला आहे. रेती व मातीची तस्करी करून ठिकठिकाणी साठे केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकही संतापले आहे. प्रशासन कोरोनाला रोखण्यात व्यस्त असल्याची संधी साधून रेती माफिया सक्रिय झाले आहे. याकडे महसूलसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. खोदकामामुळे नदीचे चित्र पालटले आहे. 

कारवाई करण्याची मागणी अवैध रेती उपसा आणि गाैण खनिज उत्खननाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तलाठी, मंडळ अधिकारी आदींचे तस्करांशी अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत रेतीचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कोणतीच कारवाई झाली नाही. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. संबंधित वाळू व काळी माती उपसा करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र गाैण खनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.  

 

टॅग्स :sandवाळू