शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

आरोग्य यंत्रणा आजारी

By admin | Updated: June 11, 2015 02:28 IST

नागरिकांना गावापासून जवळच आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले.

दिग्रस : नागरिकांना गावापासून जवळच आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले. मात्र तालुक्यातील ही यंत्रणाच आजारी पडली आहे. परिणामी नागरिकांना खासगी रुग्णालयाकडे धाव घेवून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणचे आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर रुग्णालयाचा कारभार चालत आहे. यावर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण नाही. मोठमोठ्या इमारतींमध्ये आरोग्य केंद्र, उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी जवळपास सर्वच प्रकारच्या आजारावर उपचाराच्या सोयी आहे. औषधांचा पुरवठाही नियमित आणि आवश्यक तेवढा केला जातो. मात्र अधिकारी आणि कर्मचारी चांगली सेवा देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. बहुतांश ठिकाणचे आरोग्य केंद्र तात्पुरता उपचार करून रुग्णाला इतर ठिकाणी हलविण्याचा सल्ला देतात. गंभीर रुग्ण तर दाखलही करून घेतले जात नाही. स्ट्रेचरवरच तपासणी केली जाते. बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना तासंतास डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते. ग्रामीण भागातील नागरिक घरातील आणि शेतातील कामे आटोपून रुग्णालयात जातात. तेव्हा त्यांना कुणीही डॉक्टर उपलब्ध होत नाही. कनिष्ठ कर्मचारी तपासणी करतात. वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णांकडे लक्षच दिले जात नाही. विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची वागणूक तुसडेपणाची असते. डॉक्टर केव्हा येणार याची विचारणा केल्यास उद्धट उत्तरे दिली जातात. शिवाय औषधोपचारही समाधानकारक केला जात नाही. बहुतांश कर्मचारीही तालुक्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. त्यांच्या सोयीने कामकाज सुरू केले जाते. इकडे रुग्ण तडफडत असतो तर कर्मचाऱ्यांची गप्पांची मैफल रंगलेली असते. अनेकजण तर मोबाईलवर मनोरंजन करत असतात. ही परिस्थिती तालुका पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. यानंतरही दखल घेतली जात नाही. जवळच्या रुग्णालयात चांगले उपचार होत नसल्याने गरीब नागरिकांना नाईलाजाने खासगी उपचार घ्यावे लागतात. आधीच आर्थिक अडचणीत असताना रुग्णालयाच्या खर्चाचा भारही येवून पडतो. तपासणीची फी, डॉक्टरने लिहून दिलेली औषधांची लांबलचक चिठ्ठी पाहूनच तो गारद होवून जातो. मात्र त्यांना नाईलाज असतो. बरेचदा अपघाताचे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जातात. त्यांच्यावर तत्काळ उपचार होणे अपेक्षित असते. अशा रुग्णांवरही थातूरमातूर उपचार करून परत पाठविले जाते. (प्रतिनिधी)