शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 4, 2014 00:22 IST

जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणावर घेण्यात आली नाही. त्यामुळे यावर्षी नागरिकांना पाणीटंचाईच्या ज्या झळा सोसाव्या लागल्या त्यापेक्षा आणखी तीव्र टंचाईला पुढील वर्षी तोंड द्यावे लागेल,

यवतमाळ : जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणावर घेण्यात आली नाही. त्यामुळे यावर्षी नागरिकांना पाणीटंचाईच्या ज्या झळा सोसाव्या लागल्या त्यापेक्षा आणखी तीव्र टंचाईला पुढील वर्षी तोंड द्यावे लागेल, असे चिन्ह दिसत आहे.जलसंधारणाच्या कार्यावर शासनाचे यावर्षी गंभीरतेने प्रयत्न झाले नाही. काही मोजकीच कामे यावर्षी घेण्यात आली. त्याचेही आऊटपूट जेमतेम आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत ही कामे घेता येऊ शकली असती. पण मजुरांनी ऐन हंगामातच या कामांकडे पाठ फिरविली. योजनेच्या नियमात सर्व कामे मनुष्यबळाद्वारे करणे अपेक्षित आहे. जेसीबी मशीन आणि तत्सम मशीनरीद्वारे कामे करण्यास मनाई असल्याचा फटका जलसंधारणाच्या कामांना बसला. म्हणायला येथे मग्रारोहयो अंतर्गत हजारो मजूर कार्यरत होते. पण त्यातील बहुतांश मजूर वैयक्तिक विहिरीच्या योजनेवर कार्यरत होते. शेततळे, शोषखड्डे, कच्ची नाली, ढाळी बांधकाम, विहीर पुनर्भरण आदी कामांवरही मजूर उपलब्ध होऊ शकले नाही.काही वर्षांपूर्वी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तीन प्रकारच्या लांबी-रुंदीच्या शेततळ्यांची कामे विदर्भ पॅकेज अंतर्गत शतप्रतिशत अनुदानावर करण्यात आली. ही योजना आणखी काही वर्षे राबविली जाणे आवश्यक होते. पण लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकार्‍यांनी शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला नाही. जलसंधारणाबाबत एकीकडे शासनस्तरावर प्रचंड प्रमाणावर उदासीनता असताना दुसरीकडे यासंदर्भात सामान्य नागरिकांनी- शेतकर्‍यांनीसुद्धा निदान किमान स्वत:च्या, गावाच्या, समाजाच्या हिताकरिता या योजनेला लोकचळवळीचे स्वरूप आणणे अपेक्षित होते. त्या दिशेनेसुद्धा सर्वत्र सामसूम स्थिती राहिली. रेनवॉटर हार्वेस्टिंग, गावातील सार्वजनिक, वैयक्तिक विहिरी, शेतातील वैयक्तिक विहिरींचे, हातपंपांचे, बोअरिंग्ांचे पुनर्भरण मोहीम राबवून यास गती देता आली असती.आपआपल्या शेताच्या, गावाच्या जवळपासचे नदी, नाले, तलाव, विहिरी खोल, रूंद करणे, बांध टाकणे, गाळ उपसणे आदीद्वारे ही लोकचळवळ उभी झाली असती तर पुढील वर्षी पाणीसंचय होऊन वेगळे चित्र दिसून चांगला दिलासा मिळाला असता. शासनस्तरावरही अनेक निर्णय अपेक्षित होते. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, ग्रामपंचायती यात रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती व्हावयास हवी होती. तसेच नव्या इमारतीच्या बांधकामात रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती आणि जुन्या मोठय़ा छताच्या इमारतींना टप्प्या-टप्प्याने त्याकरिता सक्ती व ग्रामपंचायत करात सूट देऊन प्रोत्साहन दिले जाणे आवश्यक होते.(प्रतिनिधी)