शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

प्लास्टिक कॅरीबॅग वापराल तर फौजदारी

By admin | Updated: August 6, 2015 00:04 IST

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापराल तर खबरदार! उमरखेड नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक कॅरिबॅग वापर बंद करण्याचे निर्देश दिले असून, .....

उमरखेड : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापराल तर खबरदार! उमरखेड नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक कॅरिबॅग वापर बंद करण्याचे निर्देश दिले असून, या कॅरीबॅगचा वापर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. उमरखेड नगरपरिषदेने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित करत कॅरीबॅगच्या वापरावर बंदी आणली आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे नियम २००६ व केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम २०११ नुसार नगरपलिका क्षेत्रात राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी आणि ८ बाय १२ इंच आकाराच्या पिशव्या वापराला बंदी घातली आहे. प्लास्टिक वापरामुळे मानावाच्या व प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. शहरातील नाल्याही तुंबत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे. उमरखेड शहरात त्यांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, या उपर कोणीही प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केल्यास त्यांच्यावर फौजदारी करण्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. (शहर प्रतिनिधी)