शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

बांगलादेशी आरोपींची ओळखपरेड

By admin | Updated: October 25, 2015 02:18 IST

पुसदमधून बनावट प्रमाणपत्र मिळवून भारतीय नागरिक असल्याचे भासविणाऱ्या दोन बांगलादेशींची शनिवारी तालुका दंडाधिकाऱ्यांपुढे ओळखपरेड घेण्यात आली.

बनावट प्रमाणपत्र : पोलीस तपासात अडसर निर्माण करण्याचा प्रयत्नपुसद : पुसदमधून बनावट प्रमाणपत्र मिळवून भारतीय नागरिक असल्याचे भासविणाऱ्या दोन बांगलादेशींची शनिवारी तालुका दंडाधिकाऱ्यांपुढे ओळखपरेड घेण्यात आली. मोहमद आझिम गाझी माजेद गाझी (२७) व हबीब ऊर्फ हबील शेख रूबल शेख (२५) रा.बांगलादेश अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पुसद ग्रामीणचे ठाणेदार अनिल कुरळकर व उपनिरीक्षक राजेंद्र नाईक, पोलीस कर्मचारी किसन राठोड, सुभाष जाधव, आसिफ शेख यांनी मुंबईतून पुसदमध्ये आणले. ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांची येथील तहसील कार्यालयात ओळखपरेड घेण्यात आली. नायब तहसीलदार देवानंद धबाले, नामदेव इसळकर, डॉ.राजू बाबळे, महा-ई सेवा केंद्राचे हनुमंत आऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते. या बांगलादेशी आरोपींना बोगस प्रमाणपत्रांचे पाठबळ देणारा नेमका कोण? याचा शोध पोलीस घेत आहे. मात्र पोलिसांच्या तपासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही सूर आहे. या तपासात त्यांना अपेक्षित व पाहिजे त्या तत्परतेने सहकार्य, मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड ऐकायला मिळते. (प्रतिनिधी)नगरपरिषदेचा कारभार : आधी प्रमाणपत्र, नंतर जन्मबांगलादेशी आरोपींच्या बनावट प्रमाणपत्राच्या अनुषंगाने पुसद नगरपरिषद, महसूल विभाग आणि महा-ई सेवा केंद्रांचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे. यातील आरोपी हबीब ऊर्फ हबील याची जन्मतारीख पुसद नगरपरिषदेमध्ये २८ मे १९९४ अशी नोंदविली गेली आहे. तर त्याला याच नगरपरिषदेने २८ मार्च १९९३ चे जन्मतारखेचे प्रमाणपत्र दिले आहे. आधी प्रमाणपत्र व नंतर जन्माचा हा अफलातून नमुना पुसद शहरात चर्चेचा विषय बनला आहे. हबीबच्या नावाने १६ फेब्रुवारी १९९३ रोजीचे भारतीय निवडणूक आयोगाचे मतदार कार्डही बनविण्यात आले आहे. त्यात हबीबचे वय ३२ वर्षे नोंदविले गेले. त्याची जन्मतारीख व हे नोंदविलेले वय पाहता तो जन्माच्यावेळीच थेट ३२ वर्षांचा असल्याचे दाखविले गेले आहे. हे दोन्ही बांगलादेशी घुसखोर मुंबईत कारागृहात असताना त्यांच्या नावाने १६ आॅगस्ट २०१५ रोजी अधिवास प्रमाणपत्रासाठी पुसद तालुक्यातील वेणी खु. च्या महा-ई सेवा केंद्रात अर्ज करण्यात आला होता. त्यासाठी रेशनकार्ड, ईलेक्शनकार्ड व जन्मतारखेचा दाखलाही बनावट जोडला गेला. या कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता सदर महा-ई सेवा केंद्राने एका दिवसात १७ आॅगस्टलाच अधिवास प्रमाणपत्र जारी केले. ऐरव्ही कोणत्याही प्रमाणपत्रासाठी किमान आठ दिवस लावणाऱ्या या केंद्राने बांगलादेशींचे एका दिवसात प्रमाणपत्र दिल्याने हे केंद्र पोलिसांच्या लेखी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.