शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

माझ्यासाठी भूमिहीन झालेल्या आई-वडिलांची स्वप्नपूर्ती

By admin | Updated: April 9, 2016 02:38 IST

माझ्या आई-वडिलांचे मी मोठा अधिकारी व्हावे हे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी वडिलांनी आपली कोरडवाहू चार एकर जमीन विकली.

रवींद्र राठोड : उपजिल्हाधिकारी झालेल्या तरुणाने सांगितले यशाचे रहस्य, उमरखेडमध्ये जंगी स्वागत अविनाश खंदारे उमरखेड माझ्या आई-वडिलांचे मी मोठा अधिकारी व्हावे हे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी वडिलांनी आपली कोरडवाहू चार एकर जमीन विकली. वडील माझ्यासाठी भूमिहीन झाले. आईने या काळात कठीण परिश्रम घेऊन मला सातत्याने प्रोत्साहन दिले. आई-वडिलांच्या स्वप्नांची मी पूर्तता केली याचा मला अभिमान आणि आनंद आहे, असे रवींद्र राठोड सांगत होता. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून दुसरा आलेला आणि उपजिल्हाधिकारी झालेला रवींद्र शंकर राठोड आपल्या मूळ गावी तालुक्यातील जनुना येथे शुक्रवारी आला. त्यावेळी तो ‘लोकमत’शी बोलत होता. यावेळी त्याने आपल्या यशाचे रहस्य सांगून कठोर परिश्रमाशिवाय कोणतेही यश मिळत नसल्याचे सांगितले. रवींद्र म्हणाला, मी दररोज १६ तास अभ्यास करीत होतो. कोणताही क्लास न लावता मी यश मिळविले. दर्जेदार पुस्तके, प्रश्नपत्रिका स्वत:च तयार करून सोडविणे आणि महत्वाचे म्हणजे तणावमुक्त अभ्यास या त्रिसूत्रीच्या आधारे यश मिळाल्याचे सांगितले. यावरच आपण थांबणार नसून अधिक परिश्रम घेऊन युपीएससीची तयारी करणार असल्याचे रवींद्र सांगतो. पहिल्या वर्गापासूनच मला अभ्यासाची सवय होती. चिल्ली, जनुना, उमरखेड या तीनही ठिकाणी शिक्षण घेताना शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गोपिकाबाई गावंडे महाविद्यालयात शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचण्यात आली आणि तेथून माझ्या मनात स्पर्धा परीक्षा देऊन मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न फुलू लागले. आई-वडिलांचे, गावाचे आणि समाजाचे नाव मोठे करण्याची खूणगाठ मी मनाशी बांधली. आपले ध्येय गाठण्यासाठी पुण्यात पोहोचले. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही क्लास लावू शकलो नाही. स्वत:च अभ्यास करून परीक्षा देत गेलो. एक वेळ भोजन करून १६ तास अभ्यास करायचो. २०१४ मध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मंत्रालयातील शिक्षण विभागात सहायक कक्ष अधिकारी म्हणून रुजू झालो. परंतु यात मन रमले नाही. नोकरी करतानाच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आॅफीस, त्यानंतर रात्री ११ वाजतापासून पहाटे ५ वाजेपर्यंत अभ्यास आणि ५ वाजता झोपलो की सकाळी ९ वाजता उठून मंत्रालय असा आपला दिनक्रम असल्याचे रवींद्र सांगत होता. परीक्षेच्या तयारीसाठी संगणक, लॅपटॉप अशा सुविधा नव्हत्या. परंतु दिवसभर अभ्यास करणाऱ्या माझ्या मित्रांचे हे साहित्य मी रात्री वापरत होतो. अशा कठोर परिश्रमातून आपल्याला हे यश मिळाल्याचे रवींद्रने सांगितले. मामाची मदत मोलाची स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मामाची मदत मोलाची झाली. त्यांच्या मदतीशिवाय मी हे यश मिळवूच शकलो नसतो, असे रवींद्र सांगतो. रवींद्रचे मामा संतोष जाधव, निरंजन जाधव, आजी पुतळाबाई जाधव यांनी रवींद्रला मोलाची आर्थिक मदत केली. यासोबतच माझ्या आई-वडिलांनी आणि इतरांनी केलेली मदत मी कधीच विसरु शकत नाही, असे सांगितले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील मुले अधिकारी व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रवींद्र राठोडने सांगितले. \