शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या उपचारासाठी विकले झोपडीवरील टिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:09 IST

मोफत औषधोपचार व आरोग्याची दर्जेदार सुविधा पुरविण्याबाबत कितीही दावे केले जात असले तरी आजही गरिबांना आजारपण दूर करण्यासाठी घरदार विकावे लागत असल्याचे धडधडीत वास्तव सांगणारी परिस्थिती दारव्हा तालुक्यातील बानायत येथील एका कुटुंबावर ओढवली आहे.

ठळक मुद्देबानायतचे कुटुंब : कडाक्याच्या थंडीत कुटुंब उघड्यावर, उपासमारीची वेळ, रोजमजुरी करून संघर्ष

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : मोफत औषधोपचार व आरोग्याची दर्जेदार सुविधा पुरविण्याबाबत कितीही दावे केले जात असले तरी आजही गरिबांना आजारपण दूर करण्यासाठी घरदार विकावे लागत असल्याचे धडधडीत वास्तव सांगणारी परिस्थिती दारव्हा तालुक्यातील बानायत येथील एका कुटुंबावर ओढवली आहे. आजारी आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने मुलाने कुडाच्या झोपडीवरील टिन विकले. त्यामुळे हे मायलेक उघड्यावर आले असून कडाक्याच्या थंडीत कुडकुडत उपाशी तापाशी दिवस काढण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.बानायत येथे पद्माबाई रामहरी खंडारे व मुलगा सुनिल हे दोघे कुडाच्या झोपडीत राहतात. पतीचे पूर्वीच निधन झाले. काही महिन्यांपूर्वी मोठा मुलगा आजारपणाने वारला. पद्माबार्इंचे वय झाले. तसेच त्या सतत आजारी राहतात. अशातच काही दिवसांपूर्वी काम काम करताना त्या पडल्या. त्यांचे हाड फ्रॅक्चर झाल्याने खाटेवरच आहे. त्यामुळे दोघांची रोजीरोटी व उपचाराची जबाबदारी मुलावर येऊन पडली. रोजमजुरी करून तो परिस्थितीशी संघर्ष करीत असताना स्वत:ही आजारी पडल्याने पैशाची आवकच बंद झाली. त्यामुळे घरात रुपयाही नसल्याने खायला अन्न नाही. त्यात दोघेही आजारी. अशा वाईट अवस्थेत गेल्या अनेक दिवसांपासून मायलेक दिवस काढत आहेत. अशातच आईची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे औषधोपचारासाठी पैसे नसल्याने मुलाने झोपडीवरील टिन विकले. घरावरचे छत गेल्याने त्यांच्यावर सध्याच्या कडाक्याच्या थंडीत उघड्यावर जीवन जगण्याची पाळी आली आहे.यादीत नाव असताना घरकूल नाहीकुडाच्या घरात दिवस काढणाऱ्या पद्माबाई घरकुल योजनेसाठी पात्र लाीार्थी आहे. त्यांचे नाव यादीतसुद्धा आहे. तरी पण या बेघर कुटुंबाला घरकुल मिळाले नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू व पात्र कुटुंबाला न्याय न देणाºया यंत्रणेचे काळीज कोणत्या पाषाणाचे आहे, हे समजायला मार्ग नाही.आरोग्य विभाग उदासीनया गरीब कुटुंबातील दोघेही अनेक दिवसांपासून आजारी असताना आरोग्य यंत्रणेतील कुणीही त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. शेवटी त्यांना घरावरचे टिन विकून उपचार करावा लागला. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे काय हाल आहे हे यावरून दिसून येते.सामाजिक पुढाकाराची गरजपद्माबाई खंडारे आणि सुनिल खंडारे या मायलेकांची व्यथा शब्दापलीकडची आहे. परिस्थितीचा आघात, त्यात वडलांचे छत्र हरविलेले. अशात प्राणप्रिय आई आजारी अन् हाताशी पैसाच नाही... अशा कठीण प्रसंगात कोणताही माणूस खचून गेल्याविना राहणार नाही. पण सुनिल याही स्थितीत आईसाठी जीवाची बाजी लावतोय. त्याची आई आहे म्हणून त्यानेच खस्ता का खाव्या, समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहेच. मग वाट कशाची बघावी? सुनिलच्या संघर्षाला थोडा दिलासा आणि थोडी आर्थिक मदत करण्याची गरज आहे. आईसाठी घर गमावण्याची ताकत सुनीलकडे आहे. पण समाजातून पारिवारिक मदत मिळाल्यास घरही वाचेल. दानशूरांनी पद्माबार्इंच्या उपचारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.