शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दाक्षिणात्य फायनान्स कंपन्यांकडून ‘शिकार’

By admin | Updated: August 30, 2014 02:07 IST

बँकांनी आधीच कर्ज दिले आणि शेतात पीक नसल्याने अधिकृत सावकार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही ही बाब हेरुन दक्षिणेतील ..

राजेश निस्ताने यवतमाळ बँकांनी आधीच कर्ज दिले आणि शेतात पीक नसल्याने अधिकृत सावकार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही ही बाब हेरुन दक्षिणेतील दोन डझनावर फायनान्स कंपन्या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. शेतकरी हे एकमेव टार्गेट या कंपन्यांचे असून तब्बल २२.५ टक्के दराने सहज कर्ज दिले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करीत आहे. अनेकदा अतिवृष्टीने शेतातील पीक वाहून गेले. तर यावर्षी वेळेवर पाऊसच न झाल्याने कपाशी, तूर, सोयाबीन ही सर्व पिके बुडाली आहेत. जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांमध्ये शासनाने टंचाईसदृश स्थिती जाहीर केली आहे. गेल्या वर्षीसुद्धा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याची पीक आणेवारी केवळ ४६ टक्के एवढी होती. यावरून जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या एकूणच आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. शेतकरी आधीच कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी बँकांकडून पीक-पाण्यासाठी कर्ज घेतले. परंतु पीक बुडाले. तडजोड करून कित्येक शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु पाऊस लांबल्याने या तीनही पेरण्या उलटल्या. पुन्हा नवीन हंगामाची पेरणी करायची झाल्यास बँका कर्जासाठी उभे करीत नाही. तर शेतात पीकच होणार नसल्याने कर्ज कशाच्या भरोश्यावर फेडणार म्हणून अधिकृत सावकारांनी शेतकऱ्यांना कर्ज देणे बंद केले आहे. त्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा अशा विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. पिके बुडाली, घर चालवायचे आहे, रितीरिवाज पाळायचे आहेत, सण-उत्सव काटकसरीने का होईना साजरे करायचे आहे. मात्र त्यासाठी पैसा नाही. शेतकऱ्यांच्या याच विवंचनेचा फायदा उठविण्याचा सपाटा दक्षिणेतील काही फायनान्स कंपन्यांनी सुरू केला आहे. शेतकरी आणि त्याच्या जमिनीचा सातबारा एवढेच टार्गेट या कंपन्यांचे आहेत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात दोन डझनापेक्षा अधिक फायनान्स कंपन्या आणि त्यांचे शंभरावर एजंट सक्रिय आहे. या एजंटांनी आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ‘शिकार’ बनविले आहे. दक्षिणेतील या फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा व्याज दर अनधिकृत सावकारापेक्षाही कितीतरी अधिक आहे. आधीच कर्जाने पिचलेला आणि कंगाल झालेला शेतकरी आपण नेमकी कोणत्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतो याची फारशी शहानिशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. सर्व काही लुटले गेले असल्याने आता आणखी काय लुटणार म्हणून सहज मिळणाऱ्या या कर्जासाठी शेतकरी कशावरही डोळे लावून स्वाक्षरी करण्यास तयार दिसत असल्याचे चित्र आहे. नाममात्र कर्ज देऊन व पुढे त्याच कर्जाआड शेतकऱ्याला व्याज चक्रात अडकवून त्याची जमीन हडपण्याचा दक्षिणेतील फायनान्स कंपन्यांचा मनसुबा दिसतो. दक्षिणेतील या फायनान्स कंपन्यांनी आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील नेर व दारव्हा या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केले आहे. याशिवाय अन्य तालुक्यांमध्येही या कंपन्यांचे एजंट फिरत आहेत.