शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

शापित फुलांच्या भुकेने शिवार हळहळले

By admin | Updated: April 26, 2017 00:16 IST

भूक म्हणजे प्रत्येकाच्या उदरी भडकणारा एक व्याकूळ डोंब. ज्यांनी भूक भोगली त्यालाच भुकेच्या वेदनाही कळतात.

व्याकूळ अनाथांच्या मदतीला धावली मानवता संतोष कुंडकर  वणी भूक म्हणजे प्रत्येकाच्या उदरी भडकणारा एक व्याकूळ डोंब. ज्यांनी भूक भोगली त्यालाच भुकेच्या वेदनाही कळतात. शिवाराच्या वेदना डोईवर घेऊन जगणारा शेतकरीही त्यातलाच एक घटक. दातृत्वाचे संस्कारही त्यांच्यातच रुजलेले. अंगणात आलेल्या याचकाला पसाभर दान देताना त्यांचे हात कधीच मागे येत नाहीत. अशाच दातृत्वाचे शेकडो हात पुढे आलेत. त्यामुळे शापित फुलांच्या भुकेचा भीषण प्रश्न मिटला अन् या निष्पापांच्या चेहऱ्यावरचे हसू अधिकच बहरून आले. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट या संस्थेच्यावतीनं वणीत चालविल्या जाणाऱ्या आनंद बालसदनातील अनाथांच्या भुकेची ही व्याकूळ कथा कुणाही गहिवरून टाकेल अशीच आहे. बदनाम वस्तीत जन्म घेणारी ही मुलं या अनाथाश्रमात आश्रयाला आहेत. आपल्या वाट्याला जे काटेरी भोग आलेत, त्याच्या यातना आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, ही भावना जपणाऱ्या वेश्या व्यवसायातील अनेक महिलांनी आपली मुले आनंद बाल सदनाकडे सोपविली आहेत. यासोबतच काही अनाथ मुलेही या अनाथ आश्रमात वास्तव्याला आहेत. कोणतेही शासकीय अनुदान नसतानाही ही संस्था लोकांच्या मदतीतून या मुलांचे संगोपन करत आहे. त्यांना शिक्षण देत आहे. अनंत अडचणींवर मात करत या संस्थेचा डोलारा पुढे जात आहे. याची जाणिव पंचक्रोशीला आहे. म्हणूनच एक नव्हे, दोन नव्हे तर १३६ शेतकऱ्यांनी पायली दोन पायली आणि देता आले तेवढे धान्य सोमवारी या संस्थेत आणून दिले अन् पाहता-पाहता चार क्विंटल गहू, दोन क्विंटल तांदूळ, ५० किलो तूर डाळ असे धान्य गोळा झाले. हटवांजरी येथील ४०, मंदर येथील ६६ व मारेगाव तालुक्यातील आवळगाव येथील ३० शेतकऱ्यांनी मुलांसाठी धान्याच्या तजविज केली. सोमवारी हे सर्व धान्य संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, उत्पादन अधिक झाले तर शेतमालाला भाव नाही. त्यामुळे कर्जाचे हप्तेही निटपणे फेडता येत नाही. एकीकडे या साऱ्या विवंचना भोगणारा हा शेतकरी दातृत्वासाठी मात्र कधीच मागे येत नाही. चिमण्या-पाखरांसाठी आपल्या शेतात ज्वारीचे तास लावणारा अन् पशुपक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधणाराही हाच शेतकरी असतो. एका दाण्यातून हजार दाणे पिकविताना त्यातील काही दाणे गरजुंसाठी देण्याची दानत ठेवणाराही शेतकरीच असतो, हेच या दातृत्वातून दिसून आले.