शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

तलाव उपसण्यासाठी सरसावले शेकडो हात

By admin | Updated: May 8, 2016 02:07 IST

तालुक्यात अनेक तलाव आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पोफाळी येथील तलावातदेखील गाळ असून तो पूर्णपणे कोरडा पडला आहे.

पोफाळीवासीयांचा उपक्रम : एका तासात एक लाखांचा निधीउमरखेड : तालुक्यात अनेक तलाव आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पोफाळी येथील तलावातदेखील गाळ असून तो पूर्णपणे कोरडा पडला आहे. आता पोफाळी व जनुना गावातील नागरिकांनी गाळ काढण्याची सुरुवात केली आहे. नागरिकांनी पुढाकार घेताच या कामासाठी तासाभरात एक लाखांची वर्गणी गोळा झाली.उमरखेडचे तहसीलदार भगवान कांबळे यांच्या हस्ते गावकऱ्यांनी गाळ उपसण्याच्या कामाची सुरुवात केली. १९७२ साली माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांनी रोजगार हमीमधून पोफाळी येथे तलावाची निर्मिती केली. तेव्हापासून या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. त्यामुळे पोफाळी, वसंतनगर, कळमुला, जनुना, गगनमाळ, पळशी, अंबाळी या गावांपर्यंत सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाण्याचे स्रोत भरपूर प्रमाणात उपलब्ध झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले. तसेच तलावात गाळही साचल्याने तलावातील पाणी पूर्णपणे आटले आहे. पोफाळी, जनुना, वसंतनगरसह इतर गावांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गुराढोरांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पोफाळी व जनुना गावातील सर्वपक्षीय लोकांनी मतभेद बाजूला सारून गाळ उपसण्यासाठी बैठक घेतली. या बाबत तहसीलदार भगवान कांबळे यांची भेट घेतली. त्यांनी शासनस्तरावर पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोन्ही गावातील नागरिकांनी लोकवर्गणी केली. शनिवारी सकाळी १० वाजता जेसीबी मशीनची पूजा करून तहसीलदार यांच्या हस्ते गाळ उपसण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी रमेश चव्हाण, पोफाळीचे सरपंच नरेंद्र बरडे, पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, शंकरराव तालंगकर, बळीराम चव्हाण, माणिकराव क्षीरसागर, सदाशिव ढोरे, सतीश नाईक, युवराज देवसरकर, अ‍ॅड.निरंजन पाईकराव, अ‍ॅड.सिद्धार्थ धोगडे, अरविंद दोडके, सुधाकर जाधव, दीपक नाईक, डॉ.गणेश राठोड, निरंजन चव्हाण, संदेश ठाकरे, आनंदराव बरडे, किरण काळे, शंकर शिलार, माधव पाटे, ग्रामसेवक गोडे, संजय देशमुख, पोलीस पाटील माधव गुठारे, बाळासाहेब खंदारे, एन.बी. राठोड यांच्यासह दोन्ही गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते. (शहर प्रतिनिधी)