शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीनगरात १३ लाखांची घरफोडी

By admin | Updated: January 25, 2015 23:28 IST

येथील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीनगरातील बंद घर फोडून चोरट्याने १२ लाखांची रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास केला.

यवतमाळ : येथील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीनगरातील बंद घर फोडून चोरट्याने १२ लाखांची रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास केला. दाराचा कोंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. मध्यरात्रीच्या सुमारास घरमालक बाहेरगाववरून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. दारव्हा मार्गावरील भारतीनगरात उमेश शालीग्राम जयस्वाल यांचे प्रशस्त घर आहे. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ते सहपरिवार पुतण्याच्या साक्षगंधासाठी हिंगोली येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री २ वाजताच्या सुमारास घरी परताच त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी कुठल्याही वस्तूला हात न लावता पाहणी केली. त्यामध्ये कपाटातील रोख आणि सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वडगाव रोड पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाच्या पाहणीदरम्यान बंद कुलूप घराच्या मागे पडून असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान रविवारी सकाळी पोलिसांनी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण केले. चोरट्यांनी घटनास्थळी कुठलाच पुरावा सोडला नाही. त्यामुळे श्वान चोरट्यांचा माग घेण्यात अपयशी ठरले. कपाटावर बोटांचे काही ठसे आढळून आले. ठसे तज्ज्ञांनी ते प्रिंट करून तपासणीसाठी नेले. मात्र कुटुंबातीलच व्यक्तीचे हे ठसे असावे असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोडचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर चोरट्यांना हुडकून काढण्यासाठी परिसरातील घरांच्या बाहेर लावून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजचा आधार घेण्यात आला. परिसरातील दोन घरांवर असलेले सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले. उमेश जयस्वाल यांचे मद्यविक्री बरोबरच अनेक व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्याकडे व्यवसायातून आलेली रोकड नेहमीच ठेवलेली असते. साक्षगंधाच्या धामधुमीत ही रोकड बँकेत टाकणे शक्य झाले नाही. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले. (स्थानिक प्रतिनिधी)