शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन अपिलाची शेकडो प्रकरणे एकाच वकिलाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केले गेले. नियमानुसार त्यात जमीन मालकांना मोबदला दिला गेला. परंतु त्यावर समाधान न झाल्याने जमीन मालकांनी जादा मोबदल्यासाठी या प्रकरणातील आर्बिट्रेटर (लवाद) तथा अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यांच्याकडे अपिल दाखल केले. परंतु यातील बहुतांश अपिल हे खान्देशातील एकाच वकिलामार्फत सादर झाले आहेत.

ठळक मुद्देखान्देश कनेक्शन : कळंबमध्ये बैठक, बँकेचा कारभारही सोईने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सत्र न्यायालयांची संख्या वाढल्याने येथील वकील मंडळी नव्या कामाच्या शोधात आहेत. तर दुसरीकडे खान्देशातील एकाच वकिलाकडे भूसंपादनाच्या अपिलाची शेकडो प्रकरणे एकवटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केले गेले. नियमानुसार त्यात जमीन मालकांना मोबदला दिला गेला. परंतु त्यावर समाधान न झाल्याने जमीन मालकांनी जादा मोबदल्यासाठी या प्रकरणातील आर्बिट्रेटर (लवाद) तथा अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यांच्याकडे अपिल दाखल केले. परंतु यातील बहुतांश अपिल हे खान्देशातील एकाच वकिलामार्फत सादर झाले आहेत. स्थानिक वकिलांकडे अवघी ९०-१०० प्रकरणे असतील. एकाच वकिलाला एवढ्या मोठ्या प्रमाणात अपिलाची प्रकरणे मिळण्यामागील ‘रहस्य’ मात्र अद्याप कुणालाही उलगडलेले नाही.खान्देशातील या वकिलाचा वाढीव मोबदल्याच्या अपिल प्रकरणाचा दर १५ टक्के असल्याचे सांगितले जाते. या वकिलाने येथील एका कमर्शियल बँकेशी जणू टायअप केले आहे. वकील म्हणेल त्या सोईने बँकेचा कारभार चालविला जातो. जमीन मालकांच्या घरी जावून बँकेची यंत्रणा खाते उघडते, लगेच चेकबुक देते. हे चेक वकिलाला दिले जातात. वकिलाने ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय बँक चेक क्लिअर करीत नाहीत. सिग्नल यायचा असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड अशा वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करून जमीन मालकांची अप्रत्यक्ष अडवणूक केली जाते. सदर वकील विशिष्ट पद्धतीने व्यवहार करीत असल्याने त्यांचे १५ टक्क्याचे गणित आजपर्यंत रेकॉर्डवर आले नसल्याचे बोलले जाते.मंगळवारी खान्देशातील या वकिलाच्या दलालांनी कळंब येथे मोबदल्याच्या अपिलासाठी प्रयत्नात असलेल्या जमीन मालकांची बैठक घेतली. त्यात १५ ते २० जण उपस्थित होते. लगेच कमर्शियल बँकेच्या यंत्रणेला तेथेच बोलावून या जमीन मालकांचे खातेही उघडले गेले व त्यांना चेकबुकही जारी करण्यात आले. एकाच वकिलाला जादा दर असूनही भूसंपादन मोबदल्याची शेकडो प्रकरणे मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.प्रकरणे शोधण्यासाठी नेमले दलालखान्देशातील या वकिलाने स्थानिक पातळीवर चार ते पाच दलाल सोडले आहेत. त्यातील एकाला कायद्याचा चांगला अभ्यास आहे. हे दलाल वाढीव मोबदल्याच्या प्रकरणासाठी जमीन मालकांना गाठतात व त्यांच्याकडून प्रकरणे मिळवितात. त्यासाठी या जमीन मालकांना तुम्हाला ‘दोनचे गुणांक मिळवून देतो’ असे दाव्याने सांगितले जाते. वास्तविक वाढीव मोबदल्याच्या प्रकरणात दोनचा गुणांक हा जमीन मालकाचा शासनाच्या आदेशानुसार हक्कच आहे. ही प्रकरणे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जातात. तेथे सुनावणीनंतर निर्णय दिला जातो. एकाच वेळी अनेक प्रकरणे कशी मंजूर केली जातील या दृष्टीने वकिलाचा प्रयत्न असतो.महामार्ग भूसंपादन वाढीव मोबदल्याची दीड हजार प्रकरणे निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज दोन-तीन प्रकरणे दाखल होतात. या जमिनींचा निवाडा एक गुणांकाने झाला आहे. मात्र शासनाने नगरपंचायत व क वर्ग नगरपालिका क्षेत्रात दोनचा गुणांक विभागीय आयुक्तांच्या परवानगीने मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार निर्णय घेतले जात आहे.- सुनील महिंद्रकर (आर्बिट्रेटर)अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग