शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी अजूनही जिवंत आहे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:56 IST

माणसांच्या गर्दीने फुगलेल्या शहरांमध्ये माणुसकी कमी होत चालली आहे. ‘मेट्रो सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या शहरात तर अपघातातील जखमीला हात लावयलाही कुणी तयार होत नाही.

ठळक मुद्देप्रतिसाद फाउंडेशन : चिमुकल्या माहीसाठी धावले यवतमाळकर

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : माणसांच्या गर्दीने फुगलेल्या शहरांमध्ये माणुसकी कमी होत चालली आहे. ‘मेट्रो सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या शहरात तर अपघातातील जखमीला हात लावयलाही कुणी तयार होत नाही. पण आपल्या यवतमाळ शहरातील विशेषत: युवकांनी माणुसकी अजूनही जिवंत ठेवली आहे. शनिवारी बसस्थानक चौकात घडलेल्या अपघातानंतर ही माणुसकी ‘प्रतिसाद फाऊंडेशन’च्या रूपाने प्रकर्षाने पुढे आली.बसस्थानक चौकात दुचाकी-ट्रकचा अपघात झाला. दुचाकीवरील डॉ. वामन हेपट आणि त्यांची सून अंजली हेपट हे दोघेही दगावले. तर अडीच वर्षांची चिमुकली माही जखमी होऊन बचावली. जाणारे गेले. पण आता प्रश्न होता माहीचा. कारण तिचे जवळचे असे कुणी नातेवाईकच उरले नाही. दूरचे नातेवाईक गावात नव्हते. अशावेळी प्रतिसाद फाऊंडेशनचे युवक धावून आले.त्यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळ गाठले. तोवर कुणीतरी माहीला घरी पोहोचविले होते. फाउंडेशनचे कार्यकर्ते पुष्पकुंज सोसायटीतील माहीच्या घरी पोहोचले, तेव्हा ती एकटीच रडत बसली होती. आजूबाजूचे शेजारी तिथे जमले होते. कार्यकर्त्यांनी लगेच डॉ. कसारे यांना बोलावले. तिचे चेकअप् करून घेतले. नंतर बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मानकर यांच्या रुग्णालयात तिला भरती केले. डॉ. जोशी यांनीही तपासणी केली. उपचारानंतर माही स्थिर झाली. मात्र, आईसाठी तिचा टाहो सुरूच होता. आता प्रश्न होता दोन मृतांच्या अंत्यसंस्काराचा. मृताचे नातेवाईक हजर नव्हते. कुणी पुण्यासारख्या दूरच्या अंतरावर होते. शेवटी प्रतिसाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीच अंतसंस्काराचीही जबाबदारी उचलली. त्याआधी नातेवाईकांना फोन करून परवानगीही घेतली.नातेवाईक यवतमाळात पोहोचण्यापूर्वीच युवकांनी कामे वाटून घेतली. ज्याला जमेल तेवढे आर्थिक योगदान दिले. उत्तरीय तपासणीपासून, हेपट यांच्या घरापुढे शामियाना लावण्यापासून ते पाण्याच्या कॅन तयार ठेवण्यापर्यंत सर्व व्यवस्था करून ठेवली. दोन अंत्यसंस्कार असल्याने प्रत्येक साहित्य दोन-दोन आणले. नातेवाईक गोळा झाल्यावर त्यांच्या हस्ते अंत्यविधी आटोपला. दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कारानंतर पाण्याच्या कॅन, जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली. अंत्ययात्रेत आलेल्या कोणत्याही व्यक्तीची गैरसोय होऊ नये याची काळजी युवकांनी घेतली.या संपूर्ण सत्कार्यासाठी प्रतिसाद फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने, सचिव प्रलय टिप्रमवार, उपाध्यक्ष बिपीन चौधरी, विनोद नगराळे, योगेश धानोरकर, देवेंद्र कळसकर, अजय बोरेले, अनिल तांबेकर, गजू राऊत, उमेश बोबडे, विनोद दोंदल, सचिन कावरे, चंदन फेंडर, राजेश पोहनकर, राजू केराम, रवी माहुरकर, राजेश इसाळकर, सौरभ इंगोले, श्याम बजाज, हर्षल राठोड, अर्पित शेरेकर, राहुल फाळके आदींनी परिश्रम घेतले.माहीच्या भविष्यासाठी आज बैठकआई-बाबा, आजी-आजोबा, मामा असे सर्व नातेवाईक गमावलेली अडीच वर्षांची माही आता एकटी आहे. तिचे भवितव्य काय, हाच प्रश्न अनेक सहृदांना सतावतोय. त्यावरही प्रतिसाद फाउंडेशनने पाउल उचलले आहे. माहीच्या दूरच्या नातेवाईकांची त्यांनी मंगळवारी बैठक ठेवली आहे. माहीच्या भविष्याची जबाबदारी कोण उचलणार, याबाबत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती प्रतिसाद फाऊंडेशनचे सचिव प्रलय टिप्रमवार यांनी दिली.