शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
5
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
6
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
7
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
8
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
9
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
10
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
11
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
12
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
13
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
14
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
15
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
16
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
17
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
18
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
19
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
20
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

खाकीवर्दीतून पाझरला माणुसकीचा झरा

By admin | Updated: May 19, 2016 02:14 IST

पोलीस कल्याण निधीसाठी आयोजित आॅर्केस्ट्राच्या कार्यक्रमात उमरखेड तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी..

आदर्श : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हातउमरखेड : पोलीस कल्याण निधीसाठी आयोजित आॅर्केस्ट्राच्या कार्यक्रमात उमरखेड तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी दहा हजारांची मदत देवून पोलीस विभागाने आपल्यातील माणुसकीचा प्रत्यय आणून दिला. पोलीस हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उभा राहतो, खाकीवर्दीतील कठोर माणूस. सर्वसामान्यही त्यांच्यापासून चार हात दूर राहतो. परंतु खाकीवर्दीतही माणूस असतो, याचा प्रत्यय उमरखेड येथे नुकत्याच झालेल्या पोलीस कल्याण निधीच्या कार्यक्रमात जाणवला. पोलीस कल्याण निधीसाठी उमरखेड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार विजय खडसे, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, उमरखेड तहसीलदार भगवान कांबळे, ठाणेदार शिवाजी बचाटे, महागावचे ठाणेदार प्रकाश शेळके, बिटरगावचे ठाणेदार सुरज बोंडे, दराटीचे ठाणेदार सागर इंगोले, पोफाळी ठाणेदार सरदारसिंग ठाकूर उपस्थित होते.मनोरंजनाच्या या कार्यक्रमात शोभा प्रकाश राठोड रा.चिल्ली, माया श्याम जाधव रा.घमापूर कुरळी, जनाबाई बालाजी ठाकरे रा.पिंपळदरी, लक्ष्मीबाई दत्ता भुसारे रा.अकोली, ज्योती संजय राठोड या पाच महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पोलिसातील संवेदनशील मन जागृत झाल्याचा प्रत्यय या ठिकाणी आला. (शहर प्रतिनिधी)उपस्थितांचे डोळे पाणावलेपोलीस कल्याण निधीच्या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना मदतीचे धनादेश देण्यात आले. त्यावेळी महागाव तालुक्यातील बारभाई तांडा येथील ज्योती संजय राठोड ही महिला मदत स्वीकारण्यासाठी मंचावर आली. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. यावेळी सर्व वातावरण भावूक झाले. मंचावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले.पोलीस हा समाजाचाच घटक आहे. शेतकरी जगला तर आपण सर्व जगू. यामुळेच पोलीस दलाने शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात दिला. उमरखेड येथे अशा उपक्रमाला प्रारंभ झाला. यापुढेही शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल.- अखिलेशकुमार सिंगजिल्हा पोलीस अधीक्षक