शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

हिवरी आरएफओ पुसद विभागातही वादात

By admin | Updated: January 28, 2016 02:27 IST

यवतमाळ वन विभागातील हिवरी वन परिक्षेत्रात नियोजनच्या निधीतून झालेली तीन कोटींची जलयुक्त शिवारची कामे चौकशीच्या कक्षेत असतानाच पुसद विभागातील प्रकारही पुढे आला आहे.

८० लाखांची पाणलोटची कामे : तीन कोटींच्या जलयुक्त शिवारची कामे चौकशीत यवतमाळ : यवतमाळ वन विभागातील हिवरी वन परिक्षेत्रात नियोजनच्या निधीतून झालेली तीन कोटींची जलयुक्त शिवारची कामे चौकशीच्या कक्षेत असतानाच पुसद विभागातील प्रकारही पुढे आला आहे. हिवरीचे आरएफओ पुसदला कार्यरत असताना विदर्भ पाणलोटची ८० लाख रुपयांची कामे चांगलीच गाजली होती. संपूर्ण जिल्ह्यातच जलयुक्त शिवारच्या पाण्याची खळखळ पाहायला मिळते. वन खात्याने यवतमाळ विभागात जलयुक्त शिवारमध्ये एक रुपयाही निधी यंदा दिला नाही आणि कामेही झाली नाही. परंतु जिल्हा नियोजन समितीच्या सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात जारी झालेल्या निधीतून जिल्हाभर मोठ्या प्रमाणात कामे घेतली गेली. कृषी विभाग व वन विभाग या दोनही खात्यांतर्गत झालेल्या कामांमध्ये प्रचंड घोळ आहे. भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्तेच जलयुक्त शिवारच्या पाण्यात ‘चिंब’ झाले. यवतमाळलगतच्या हिवरी वन परिक्षेत्रात तीन कोटींची कामे जलयुक्त शिवारमध्ये केली गेली. त्यातील दीड कोटींची कामे भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांच्या नावावर घेतली गेली. त्याची चर्चा सुरू असतानाच हिवरीचे आरएफओ एस.जी. हटकर यांची पुसदला वनपाल असतानाचे कारनामेही उघड होत आहे. पुसदला विदर्भ पाणलोटच्या ८० लाखांच्या कामात त्यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला होता. स्वत:च मशीनने कामे केली, ती निकृष्ट दर्जाची होती. या कामांच्या अभिलेख्यांचा (कॅश बुक) वाद चांगलाच गाजला होता. पुसदचे तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी बी.के. चव्हाण यांनी पाणलोटच्या या कामांचे लेखे गहाळ केल्याची चर्चा यावेळी होती. या प्रकरणात एका वन मजुराच्या नेत्याने मध्यस्थी करून प्रकरण मिटविले होते. विशेष असे पुसद पाणलोट प्रकरणात हटकर आणि तत्कालीन पुसद डीएफओ जी.एस. बल्की यांना चार्जशिटसुद्धा दिली गेली होती. मात्र वरिष्ठ मेहेरबान झाल्याने त्यावेळी कारवाई टळली होती. त्याच हटकर यांच्या कारनाम्यांनी आता हिवरी वनपरिक्षेत्र गाजत आहे. हटकर यांचा यवतमाळ वन परिक्षेत्रावर डोळा आहे. येथील आरएफओ शंकर मडावी यांना हूसकून लावून त्यांच्या जागेवर वर्णी लावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला पर्याय म्हणून त्यांनी उमरखेड वन परिक्षेत्र ठेवले आहे. त्यासाठी उमरखेडमध्ये भाजपाच्या गोटात हिवरीतून फिल्डींग लावली जात असल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)