शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

बारावीचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ निकाल घोषित

By admin | Updated: May 28, 2015 02:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी घोषित करण्यात आला.

वणी/मारेगाव/झरी/पांढरकवडा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. यात गेल्या अनेक वर्षात यावर्षी ‘रेकॉर्ड ब्रेक’ निकाल लागल्याचे दिसून येत आहे. उपविभागातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयाला यावर्षी ‘अच्छे दिन’ आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.वणी तालुक्यातील पंचशील विद्यालय नांदेपेरा व लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल वणी या दोन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. बहुतांश महाविद्यालयांचे निकाल ९० टक्केपेक्षा अधिकच आहे. सर्वात कमी निकाल आदर्श कनिष्ठ महाविद्यालय वणीचा आहे. वणी तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी ८८.६५, शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वणी ९५.२७, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय घोन्सा ८८.५२, पंचशील कनिष्ठ महाविद्यालय नांदेपेरा १००, श्री गुरूदेव कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर ९२.२३, जिल्हा परिषद ऊर्दू उच्च माध्यमिक विद्यालय वणी ९५.८३, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय वणी ६०, राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय राजूर (कॉलरी) ९१.१८, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय शिंदोला ९७.३७, जगन्नाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालय वांजरी ७६.४७, वणी पब्लिक ज्युनियर कॉलेज वणी ९८.१८, जगन्नाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालय वणी ६२.५०, बालाजी कनिष्ठ महाविद्यालय सावर्ला ९२.५९, लायन्स विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वणी १००, राजे संभाजी ज्युनियर कॉलेज कायर ९४.७४, महात्मा जोतिबा फुले ज्युनियर कॉलेज कायर ९०.३२, भास्करराव ताजने कनिष्ठ महाविद्यालय वेळाबाई ५८.८२, हाजी शिराजउद्दीन कनिष्ठ महाविद्यालय राजूर (कॉलरी) ७२.७३, भास्करराव ताजने कनिष्ठ महाविद्यालय कळमना ७२.२२ असा निकाल लागला आहे. वणी तालुक्याचा सरासरी निकाल ९०.६३ टक्के लागला. तालुक्यातून १ हजार ६२२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार ४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खासगी विद्यार्थ्यांचा निकाल मात्र केवळ ४७.३५ टक्के लागला. वणी तालुक्यातून वणी पब्लिक स्कूलची रविना विनोद झाडे व लोकमान्य टिळक महाविद्यालयाची माधुरी नानाजी विधाते या दोघी ८३.५४ टक्के गुण घेऊन प्रथम आल्या आहेत.मारेगाव तालुक्यातून ६३३ नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९१.१५ टक्के लागला. खासगी विद्यार्थ्यांचा निकाल ४८.४८ टक्के लागला. तालुक्यातील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व शासकीय आश्रमशाळा बोटोणी या कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. मारेगाव तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. भारत विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय कुंभा ९५.८३, राष्ट्रीय विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव ९०.१६, आर्ट कॉमर्स ज्युनियर कॉलेज मारेगाव ८३.७, राष्ट्रीय आर्ट ज्युनियर कॉलेज हिवरा-मजरा ९२.११, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय मार्डी ९८.२१, चोपणे उच्च माध्यमिक विद्यालय बोटोणी ९६, जीवन विकास उच्च माध्यमिक विद्यालय हटवांजरी ९५.८३, विवेकानंद आर्ट ज्युनियर कॉलेज कान्हाळगाव ९१.३८, शासकीय आश्रमशाळा बोटोणी १००, संकेत ज्युनियर कॉलेज मारेगाव ९४.१२, नेताजी सुभाषचंद्र बोस ज्युनियर कॉलेज म्हैसदोडका ८३.३३, विद्या निकेतन ज्युनियर कॉलेज आॅफ सायन्स १०० टक्के असा निकाल लागला आहे. मारेगाव तालुक्यातून विद्यानिकेतून ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सची सीमरन युनुस शेख ही ७७.६९ टक्के गुणांसह प्रथम आली. आदिवासीबहुल झरी तालुक्याचाही बारावीचा निकाल नेत्रदीपक लागला आहे. तालुक्यातून ५६० नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९४.८२ टक्के लागला. खासगी विद्यार्थ्यांचा निकाल ३८.२४ टक्के लागला. झरी तालुक्यातील मांडवी येथील सूर्यतेज उच्च माध्यमिक विद्यालय व माथार्जुन येथील बालाजी ज्युनियर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला. शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. राजीव कनिष्ठ महाविद्यालय झरीजामणी ९५.१२, राजीव कनिष्ठ महाविद्यालय पाटण ९२.१९, आदर्श हायस्कूल मुकुटबन ९३.५७, शासकीय आश्रमशाळा शिबला ९१.८९, सूर्यतेज उच्च माध्यमिक विद्यालय मांडवी १००, सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय बाळापूर ९२, मातोश्री पुनकाबाई आर्ट ज्युनियर कॉलेज मुकुटबन ९८.५५, बालाजी ज्युनियर कॉलेज माथार्जुन १००, सूर्यतेज विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय झरी ८५.७१ टक्के निकाल लागला आहे.पांढरकवडा तालुक्याचा बारावीचा निकाल ९५़५३ टक्के लागला़ तालुक्यातील एकूण २२ कनिष्ठ महाविद्यालयांतून एक हजार २३१ विद्यार्थ्यी परीक्षेला बसले. त्यापैकी १ हजार १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ येथील जि़प़ (माजी शासकीय) कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुरभी दिगंबर आस्कर ही ९२़३० टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम आली़यावर्षी २२ पैकी ७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला़ कनिष्ठ महाविद्यालयनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे़ जिल्हा परिषद (माजी शासकीय) कनिष्ठ महाविद्यालय, पांढरकवडा ९७़२० टक्के, बा़दे़ पारवेकर कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ८८़७६, शिवछत्रपती कनिष्ठ महाविद्यालय पाटणबोरी १००, के.ई.एस. कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ९४़८७, म़जोफ़ुले विद्यालय करंजी ९१़३०, विकास हिन्दी कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ९७़८४, जनता कनिष्ठ महाविद्यालय पाटणबोरी १००, नेताजी कनिष्ठ महाविद्यालय मोहदा ९७़१४, राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ९९़०८, स्वक़ृष्णराव ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय बोथ ९५़६५, संकल्प कनिष्ठ महाविद्यालय उमरी १००, शिवरामजी मोघे कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ९४़६८, आबासाहेब पारवेकर कनिष्ठ महाविद्यालय रूंझा १००, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय पहापळ ९०़४८, जनसेवा कनिष्ठ महाविद्यालय उमरी ८२़७६, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय खैरगाव (देशमुख) ९४़१२, राजारावजी बोडगेवार कनिष्ठ महाविद्यालय पाटणबोरी १००, संकल्प कनिष्ठ महाविद्यालय कोंघारा ९२़८६, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोहदा ९२़९६, सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय वाई १००, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय भाडउमरी १०० आणि गाडगे महाराज उच्च माध्यमिक आश्रमशाळा उमरीचा (रोड) ९३़१० टक्के निकाल लागला आहे. (लोकमत चमू)