शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कसा करायचा प्रवास ? केवळ ७१ बसेस मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST

बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी तर यवतमाळ विभागातून अमरावती वगळता कुठेही बसेस सुरू नाहीत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसद्वारे वर्धा, नागपूर, नांदेड, चंद्रपूर आदी ठिकाणी प्रवास करावा लागतो. महामंडळाचे अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याचे गाव गाठून त्यांच्या कुुटुंबाची, गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीची, लोकप्रतिनिधीची भेट घेवून एसटी कर्मचाऱ्याला कामावर पाठवा, अशी विनंती करत आहे. यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे यवतमाळ विभागातून ४८५ पैकी केवळ ७१ बस फेऱ्या मार्गावर धावत आहे. महामंडळाकडून बसफेऱ्या वाढविण्यासाठी विविध प्रयोग केले जात असतानाही अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी तर यवतमाळ विभागातून अमरावती वगळता कुठेही बसेस सुरू नाहीत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसद्वारे वर्धा, नागपूर, नांदेड, चंद्रपूर आदी ठिकाणी प्रवास करावा लागतो. महामंडळाचे अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याचे गाव गाठून त्यांच्या कुुटुंबाची, गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीची, लोकप्रतिनिधीची भेट घेवून एसटी कर्मचाऱ्याला कामावर पाठवा, अशी विनंती करत आहे. यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटीच्या फेऱ्या वाढण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. 

संपकरी संपावर ठाम - एसटीचे शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. - कितीही आर्थिक अडचणी निर्माण झाल्यातरी विलीनीकरणाचा लढा सुरूच राहील, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही.  

 पुसद, उमरखेड आगारातून केवळ चार बसेस      - पुसद आणि उमरखेड आगारातून प्रत्येकी केवळ दोन बसेस मार्गावर धावत आहे. या आगारात अनुक्रमे ६५ आणि ५५ बसेस आहेत.  - सर्वाधिक २८ बसेस यवतमाळ आगारातून सोडल्या जात आहे. या आगारामध्ये ८३ बसेस आहे. मुख्यालयांच्या ठिकाणचे बसस्थानक असतानाही कर्मचाऱ्यांचा थंड प्रतिसाद आहे.  

ग्रामीणची मदार खासगीवरच - सध्या सुरू असलेल्या बसफेऱ्या केवळ तालुक्याच्या गावापर्यंत जात आहे. ग्रामीण भागात अपवादानेच बसफेरी आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांंना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. 

बसफेऱ्या वाढविण्यासाठी विभाग पातळीवर प्रयत्न केेले जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येत आहे. याशिवाय एसटी कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचारी, वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक यांची सेवा चालक-वाहक म्हणून घेतली जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आरोग्य चाचणी आदी बाबी तपासून त्यांना कामावर घेण्यात येत आहे. कर्मचारी कामावर यावे यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. यामुळे फेऱ्या वाढतील. - श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक

टॅग्स :ST Strikeएसटी संप