शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीपीई किट मागितल्याने राज्याची सुरक्षा धोक्यात कशी ? ‘मॅट’चा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 15:29 IST

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून परिचारिकेने पीपीई किट मागितली, एवढ्या कारणावरून राज्याची सुरक्षा धोक्यात आली कशी? असा सवाल मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देअधिष्ठातांना निलंबनाचा अधिकारच नाहीपरिचारिकेचे निलंबन रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून परिचारिकेने पीपीई किट मागितली, एवढ्या कारणावरून राज्याची सुरक्षा धोक्यात आली कशी? असा सवाल मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी उपस्थित केला. या प्रकरणात परिचारिकेचे झालेले निलंबन रद्द करण्यात आले.न्या. कुऱ्हेकर यांनी २३ जुलै रोजी या संबंधीचा निर्णय दिला. परिचारिकेचे निलंबन रद्द करून दोन आठवड्यात त्यांना सर्व लाभासह पूर्वपदावर नेमण्याचे आदेश ‘मॅट’ने दिले आहे. आरिफा रियाज शेख असे या परिचारिकेचे नाव आहे. त्या पुण्यातील ससून रुग्णालयात कार्यरत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ससूनच्या सर्व स्टाफची ड्युटी पुण्यातील एअरपोर्टवर लावण्यात आली होती. दरम्यान कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर नर्सेस कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या आरिफा रियाज यांनी पीपीई किट देण्याची मागणी केली. किट नसल्यास काम करणे कठीण होईल, असे सांगितले.

मात्र या माध्यमातून आरिफा शेख यांनी व्हॉटस्अ‍ॅपवर मॅसेज व्हायरल केले, वातावरण बिघडविले, अफवा पसरविली असा ठपका ठेवून ससूनचे अधिष्ठाता चंदनवाडे यांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली. एफआयआरही दाखल करण्यात आला. अधिष्ठातांनी महाराष्ट्र शिस्त व अपिल नियम १९१९ मधील कलम ४ (१) (ब)चा हवाला देत आरिफा शेख यांच्या निलंबनाचे आदेश स्वस्वाक्षरीने जारी केले.

अधिकार वैद्यकीय शिक्षण संचालकांनाअखेर आरिफा यांनी या निलंबनाला अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. आपण वर्ग-३ चे कर्मचारी असून आपल्या निलंबनाचे अधिकार संचालक वैद्यकीय शिक्षण यांना असल्याचे ‘मॅट’ला सांगण्यात आले.

निलंबन आदेशातही अनेक तांत्रिक चुकाआपल्या विरोधात कोणताही पुरावा चौकशीत आढळला नाही किंवा सायबर गुन्हे विभागामार्फत तपास केला गेला नाही. आरिफा यांच्या निलंबन आदेशातही अनेक तांत्रिक चुका असल्याची बाब ‘मॅट’च्या निदर्शनास आणून दिली गेली. मुळात अधिष्ठातांना निलंबनाचा अधिकारच नसल्याची बाब ‘मॅट’च्या निदर्शनास आणून देण्यात आली.

बांदिवडेकरांचा युक्तिवाद मॅटने स्वीकारलाकोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी जीवाच्या भीतीने पीपीई किट मागितली तर त्यात राज्याची सुरक्षा धोक्यात आली कशी असा मुद्दा उपस्थित केला गेला. ‘मॅट’लाही हा मुद्दा पटला. त्यामुळे ‘मॅट’ने परिचारिका आसिफा यांचे निलंबन रद्द केले. या प्रकरणात शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी ए.जे. चौगुले यांनी काम पाहिले. आरिफा यांच्यावतीने अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर, अ‍ॅड. गायत्री गौरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालय