लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील सावरगाव बंगला येथील पात्र लाभार्थी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासून वंचित असून यासंदर्भात जाब विचारण्यासाठी शेकडो नागरिक येथील पंचायत समितीवर धडकले. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला.सावरगाव बंगला येथील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील अनेक लाभार्थ्यांना जाणिवपूर्वक लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप होत आहे. येथील ७० पैकी केवळ २८ लोकांची नावे यादीत दिसून आली. सरपंच, सचिवांना याबाबत विचारल्यास त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. याबाबत भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बळवंत मनवर यांनी पुढाकार घेतला. सर्वजाती धर्माच्या वंचित लाभार्थ्यांसाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी पंचायत समितीवर धडक दिली.
घरकुलासाठी पंचायत समितीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 22:01 IST
तालुक्यातील सावरगाव बंगला येथील पात्र लाभार्थी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासून वंचित असून यासंदर्भात जाब विचारण्यासाठी शेकडो नागरिक येथील पंचायत समितीवर धडकले. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला.
घरकुलासाठी पंचायत समितीवर धडक
ठळक मुद्देसावरगावचे नागरिक संतप्त : पुसद गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन