शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

‘इव्हीएम’मुक्तीसाठी घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:43 IST

इव्हिएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका रद्द करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहूजन महासंघाच्या वंचित बहूजन आघाडीच्यावतीने सोमवारी येथील तिरंगा चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देभारिप-बहुजन महासंघ : लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात तफावत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इव्हिएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका रद्द करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहूजन महासंघाच्या वंचित बहूजन आघाडीच्यावतीने सोमवारी येथील तिरंगा चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यामध्ये साम्य दिसत नाही. यामुळे मदमोजणी प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करीत भारिप-बहूजन महासंघ प्रणित वंचित बहूजन आघाडीच्या नेतृत्वात राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून यवतमाळात आंदोलन झाले.यावेळी आंदोलकांनी इव्हीएमवरील मतदानप्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. ‘इव्हिएम हटवा-लोकशाही वाचवा’ असा नाराही यावेळी लावण्यात आला. निवडणूक काळात झालेल्या अनियमिततेवर निवडणूक आयोगाने मौन पाळले आहे. यावरही संशय व्यक्त केला आहे.राज्य निवडणूक आयोगाने ४८ जागांवर फेर निवडणूक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे यांनी केले. यावेळी नईम शेख, खंडेराव कांबळे, सुभाष बहादुरे, शैलेश भानवे, नीलेश स्थूल, लक्ष्मण पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.नेर येथे तहसीलदारांना निवेदन सादरनेर : इव्हीएम बंदच्या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने सोमवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालयासमोर दुपारी घंटानाद करण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघात झालेले मतदान आणि इव्हीएमचे मोजलेले मतदान यात फरक असल्याचे निदर्शनास आले. निवडणूक प्रक्रियेतून इव्हीएम बाद करावे, अशी मागणी तहसीलदार अमोल पोवार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रेमदास रामटेके, शहर प्रमुख प्रशिक धांदे, भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस प्रा. नाजूक धांदे, एमआयएमआयएमचे तालुका अध्यक्ष मोहीम अहेमद अ. सत्तार, भीम तरुण उत्साही मंडळाचे निरंजन मिसळे, उदयभान सोनोने, भाऊराव गायकवाड, गजानन मनवर, नाना अघम, उद्धवराव मिसळे, शेखर गजभिये, राजू वासनिक, चरण रंगारी, मजीद खाँ पठाण, गौतम मिसळे, विश्वनाथ वासनिक, शिवदास मिसळे, राहुल मिसळे, बबनराव सोनुले, प्रफुल्ल मिसळे, सुभाष मिसळे, एस.जी. इंगोले, मनिष मेश्राम, लक्ष्मण वानखडे, सतीश उरकुडे, प्रवीण सोनटक्के, गोविंद लोणारे आदी उपस्थित होते.