शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फळबागांचे झाले वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:41 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील फळबागांचे वाळवंट झाले आहे. मात्र कृषी, महसूल व ग्रामीण विकास यंत्रणेला याची खबरबातच नाही. सर्वेक्षणाचा स्थायी आदेश असल्याची बतावणी करून जबाबदारी झटकण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत आहे.

ठळक मुद्देदुष्काळी स्थिती : वाळलेल्या फळझाडांची आकडेवारीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील फळबागांचे वाळवंट झाले आहे. मात्र कृषी, महसूल व ग्रामीण विकास यंत्रणेला याची खबरबातच नाही. सर्वेक्षणाचा स्थायी आदेश असल्याची बतावणी करून जबाबदारी झटकण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत आहे.जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून १९९० पासून मार्च २०१८ अखेरपर्यंत ५० हजार २४५ हेक्टरवर फळबाग लागवड झाल्याची नोंद आहे. यापैकी प्रत्यक्ष किती क्षेत्रातील फळबागा आज जीवंत आहे, याची कुठलीही आकडेवारी कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. रोहयोतून फळबाग लागवडीचा कार्यक्रम बंद झाल्याने त्याचे अपडेट घेणे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने बंद केले आहे. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण आहे. अशा भीषण संकट काळात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलविलेल्या फळबागांचे डोळ्यादेखत वाळवंट होत आहे. प्रामुख्याने संत्रा, मोसंबी, केळी, लिंबू, आवळा या फळबागांची लागवड करण्यात आली होती. आता संपूर्ण फळबागाच नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काहींनी उपलब्ध पाण्यातून झाडे वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. मात्र त्यालाही अपेक्षित मिळताना दिसत नाही. दुष्काळी स्थितीमुळे झालेल्या या नुकसानीची नोंद घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार नाही. दुष्काळात गावातील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे काम करून त्याचा अहवाल प्रशासकीय स्तरावर पाठवावा, असे स्थायी आदेशच देण्यात आले आहे. प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्याने सांगूनही वाळलेल्या फळबागांचे सर्वेक्षण होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.मदतीची अपेक्षाशासनाने जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाची झळ संपूर्ण जिल्हा सोसत आहे. फळबाग लागवड करणारा शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. त्याला मदतीची गरज आहे. मात्र शासकीय यंत्रणा सर्वेक्षणासाठी वाळलेल्या फळबागांकडे फिरकण्यास तयार नाही. यामुळे शेतकरी यंत्रणेच्या निगरगट्ट धोरणाचा बळी ठरत आहे.