शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी आशा स्वयंसेविकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:22 IST

गावपातळीवर आरोग्य सेवा देणाऱ्या आशांनी मानधन नको, वेतन द्यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारले. यवतमाळातील तिरंगा चौकात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी धरणे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावपातळीवर आरोग्य सेवा देणाऱ्या आशांनी मानधन नको, वेतन द्यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारले. यवतमाळातील तिरंगा चौकात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी धरणे दिले.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. असे असतानाही त्यांना कामाचा अल्पच मोबदला मिळतो. यामुळे आशांना कुटुंब चालविणेही अवघड झाले आहे. यामुळे आशांचा मानधनात वाढ करण्यात यावी. आशांना किमान वेतन १८ हजार आणि गटप्रवर्तकांना २१ हजाराचे दरमहा वेतन देण्यात यावे. ही प्रमुख मागणी आशांनी लावून धरली.आरोग्य क्षेत्रातील रिक्तपद भरण्यात यावे. शासनाच्या आरोग्य खात्यातील रिक्तपदांवर आशा आणि गटप्रवर्तकाची नेमणूक करण्यात यावी. जननी शिशू सुरक्षा योजनेच्या लाभासाठी दारिद्र्यरेषेची अट शिथील करण्यात यावी.यासह विविध मागण्याचा यामध्ये समावेश आहे.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे, जिल्हासचिव संजय भालेराव, नानासाहेब उईके, विद्या मुनेश्वर, उषा मुर्खे, बबीता पेंदोर यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा