शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची सोयाबीनवर आशा, कपाशी संकटातच

By admin | Updated: August 31, 2014 00:08 IST

दमदार पावसाच्या हजेरीमुळे वणी तालुक्यात सोयाबीनचे पीक बहरले आहे. मात्र पावसाअभावी वाढ खुंटल्याने कपाशीची स्थिती अद्याप चिंताजनकच आहे.

नांदेपेरा : दमदार पावसाच्या हजेरीमुळे वणी तालुक्यात सोयाबीनचे पीक बहरले आहे. मात्र पावसाअभावी वाढ खुंटल्याने कपाशीची स्थिती अद्याप चिंताजनकच आहे.यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. परिणामी शेतकरी बांधव निराशेच्या गर्तेत कोरड्या दुष्काळात सापडले आहे. पिकांच्या उत्पन्नात घट येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व आशाच मावळली आहे़ दरवर्षी विजया दशमीच्या मुहूर्तावर शेतकरी कपाशीची सीतादही करीत होते. व्यापारीही याच मुहूर्तावर कापूस खरेदीला प्रारंभ करीत होते. मात्र यावर्षी विजया दशमीला कापूस निघणे अवघड झाले आहे.सुरूवातीला विलंबाने आलेल्या थोड्या पावसातच शेतकऱ्यांनी पेरणी केली. पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबारच, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले. वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल ३0 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी, २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार-तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पुन्हा पावसाने दडी मारल्याने बळीराजा पुरता संकटात सापडला आहे. आता पोळ्यापासून पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. मात्र तरीही कपाशीची वाढ खुंटल्याने कपाशीचे पीक अद्याप संकटातच आहे. परिणामी शेतकऱ्यांची सर्व आशा सोयाबिनवर टिकून आहे.दरवर्षी साधारणत: विजया दशमीपासून कापूस वेचणी सुरू होत होती. सीतादहीचा कापूस उच्च प्रतीचा असल्याने शेतकरी तो बाजारपेठेत विकण्यासाठी आणत होते. त्यातूनच दसरा, दिवाळी सण साजरे करीत होते. मात्र यावर्षी उशिरा पेरण्या झाल्याने आणि त्यातच पावसाने दडी मारल्यामुळे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू होईल अथवा नाही, याबाबत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्येही शंका आहे़ पेरणी लांबल्याने कपाशीची बोंडे अद्याप परिपक्व होण्यास बराच कालावधी लागणार आहे़ त्यामुळे यावर्षी सीतादहीची कापूस वेचणी दिवाळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ या सप्ताहात पोळ्यापासून वणी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाच्या दडीने नापिकीचे संकट कायम होते़ मात्र मध्यंतरी योग्य वेळी पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पिकाला संजीवनी मिळाली आहे. तथापि आता सोयाबिनवर उंट उळीने आक्रमण केले आहे. तसेच अवेळी पाऊस आल्याने सोयाबिनच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये वर्तविली जात आहे़ (वार्ताहर)