शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सन्मानित

By admin | Updated: April 26, 2017 00:12 IST

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे ...

सचिंद्र प्रताप सिंह : उत्कृष्ट कार्याची दखल यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली दोन वर्षात केलेल्या लोकाभिमुख कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय आदी उपस्थित होते. नागरी सेवा दिनी दरवर्षी राज्य शासनाच्यावतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन गौरविले जाते. सचिंद्र प्रताप सिंह यांनी मे २०१५ मध्ये जिल्हाधिकारी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासनात शिस्त आणण्यासोबतच जिल्हा यंत्रणा प्रचंड गतिमान केली. सामान्य नागरिकांची कामे कुठेही अडणार नाही, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात मागील दोन वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक पिककर्ज वाटप झाले. जिल्ह्याचे रबी क्षेत्र दुप्पट झाले. शेतकरी आत्महत्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्के घट झाली. ई-डिस्ट्रीक्ट योजनेंतर्गत जिल्हा राज्यात सर्वाधिक आॅनलाईन प्रमाणपत्र वितरण करणारा जिल्हा ठरला. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविले. रेल्वे भूसंपादनाची कार्यवाही गतिमान झाली. बोरी-तुळजापूर महामार्ग बांधकामाच्या निविदाही जिल्हा प्रशासनाच्या जलद भूसंपादनाने प्रसिध्द झाल्या. या विविध कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. (वार्ताहर)