शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

रक्तफुलांनी सजल्या रानवाटा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:16 IST

वसंत ऋतूची चाहूल लागली की, पानगळतीने अवघे जंगल गलबलून जाते. एरव्ही निरव शांत आणि स्थितप्रज्ञ राहणारे शिवार, उन्हाळ्यातील चकाकणाऱ्या तप्त सूर्यप्रकाशात वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने हळूवार डोलायला लागते. पानांच्या गळतीने झाडांच्या ओळीत सळसळ वाढते.

ठळक मुद्देवसंतातला बहर : केशरी रंगछटांनी उजळले शिवार, दऱ्याखोऱ्यात फुलण्याचा उत्सव

संतोष कुंडकर।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वसंत ऋतूची चाहूल लागली की, पानगळतीने अवघे जंगल गलबलून जाते. एरव्ही निरव शांत आणि स्थितप्रज्ञ राहणारे शिवार, उन्हाळ्यातील चकाकणाऱ्या तप्त सूर्यप्रकाशात वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने हळूवार डोलायला लागते. पानांच्या गळतीने झाडांच्या ओळीत सळसळ वाढते. ईकडे पळस वृक्षे वसंतोत्सवासाठी फुलारून येतात. बहर वेगाने वाढतो अन् अवघ्या वनराईतील रानवाटा रक्तफुलांच्या केशरी रंगछटांनी उजळून निघतात.गुजरातीत खाकेरा, संस्कृतमध्ये पलाश, त्रिपत्रक, रक्तपुष्पक तर इंग्रजी भाषेत फ्लेम आॅफ द फॉरेस्ट अशा विविध नावांनी ओळखला जाणारा मराठी भाषेतील पळस सध्या रानावनात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पिवळ्या आणि केशरी अशा दोन रंगात उमलणारी पळसाची फुलं तशी सर्वांच्याच जिव्हाळ्याची. रंगपंचमी आली की, जुन्या पिढीला पळसफुलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पूर्वी रंगपंचमीला पळसफुलांचाच रंग उधळला जात असे. उन्हाळ्याच्या सुरूवातीला म्हणजेच वसंत ऋतूच्या सुरूवातीला पळसवृक्ष पानांचे नवे आवरण पांघरतो, तर वसंत पंचमीला तो फुलांनी सजतो. मिश्र मोसमी जंगलात अस्तित्व दाखविणारा पळस राज्यभर दृष्टीपथास पडतो. दूर डोंगरदऱ्यावर नजर फिरविली की, पेटणारी ज्योत जशी हवेमुळे लहानमोठी होताना दिसते, तशीच ही पळसफुलं दिसायला लागतात. म्हणूनच ब्रिटीश राजवटीतील गोऱ्या साहेबांनी या फुलांना ‘फ्लेम आॅफ द फॉरेस्ट’ असे नाव दिले असावे. रानात असा उमलण्याचा उत्सव सुरू असताना पळसफुलांपाठोपाठ पांगारा, आंबा, काटसावरीची झाडंही फुलांवर येतात.हिवाळा संपला की, जंगलातील पानवठे आटायला सुरूवात होते. उन्हाचा तडाखा वाढतो. ही रानफुलं मग जंगलातील व्याकूळ पाखरांना तहानभूक भागविण्यासाठी स्वत:तील द्रव पुरवितात आणि म्हणूनच तापत्या उन्हात या फुलारलेल्या झाडांवर मैना, पोपट, बुलबुल, नाचरा, कोतवाल, दयाळ असे अनेक पक्षी आणि मधमाश्या, मुंग्या यांची जत्राच भरते. एक जीव (पळसफुलं) दुसऱ्या जीवाला जीवनरस वाटत आहे, असे मनोहारी दृष्य रानावनात पहायला मिळते.बहुउपयोगी पळसाची होतेय निर्दयपणे कत्तलपळसाची आंतरसाल महिलांच्या विविध आजारावर रामबाण समजली जाते. पळसफुलांचा काढा किंवा रस तापशमक आहे. उन्हाळीच्या विकारावर तो उपयुक्त ठरतो. पळसाच्या बिया (पळसपापडी) कृमीनाशक व विरेचक म्हणून वापरल्या जातात. मात्र जलतन व होळीच्या नावावर पळसाची कत्तल होते.