शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

बाबूगिरीने रखडले पोलिसांचे गृहकर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 21:10 IST

सुरेंद्र राऊत। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा पोलीस प्रशासनाला बाबुगिरीने संपूर्णपणे पोखरले आहे. प्रशासन प्रमुख पोलीस वेलफेअरसाठी परिश्रम ...

ठळक मुद्देअनेकांचे प्रस्ताव : जिल्ह्यातून एकही अर्ज मंजूर नाही

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस प्रशासनाला बाबुगिरीने संपूर्णपणे पोखरले आहे. प्रशासन प्रमुख पोलीस वेलफेअरसाठी परिश्रम घेत असताना यंत्रणा त्याला सुरूंग लावण्यात व्यस्त आहे. यातूनच घरांच्या ‘डीजी होम लोन’साठी अर्ज करणाऱ्या जवळपास २०० कर्मचाऱ्यांपैकी एकाचाही अर्ज मंजूर झाला नाही. त्यामुळे पोलिसांचे स्वत:च्या घराचे स्वप्न भंगले आहे.पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची शिस्तीचे खाते म्हणून मुस्कटदाबी केली जाते. पोलिसांना आपल्या कुचंबणेबाबत वरिष्ठांकडेही फारसे बोलताही येत नाही. हीच अडचण ओळखून लिपिकवर्गीय यंत्रणा प्रत्येक ठिकाणी त्यांची अडवणूक करते. सेवेतील कर्मचाऱ्यांना स्वत:चे हक्काचे घर असावे, यासाठी ‘डिजी होम लोन’ (पोलीस महासंचालक घरबांधणी अग्रीम) दीर्घ मुुदतीकरिता दिले जाते. ३० नोव्हेंबर रोजी होम लोन मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांची २०१७-०१८ या आर्थिक वर्षातील अंतिम यादी जाहीर करण्यात आली. यात यवतमाळ जिल्ह्यातील एकाही कर्मचाऱ्याचे नाव नाही. विशेष म्हणजे प्रतीक्षा यादी २१ जुलै २०१६ रोजीच प्रसिद्ध झाली होती. त्यात येथील पोलीस कर्मचाºयांचे नाव होते. मात्र अंतिम यादीसाठी जिल्हा कार्यालयाकडून वेळेत पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे ज्येष्ठता डावलून बुलडाणा येथील कर्मचाºयांना डीजी होम लोन देण्यात आले आहे.जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी २००२ पासून डीजी होम लोनसाठी अर्ज केले आहे. मात्र कार्यालयातील लिपिकवर्गीय यंत्रणेकडून नियमित पाठपुरावा होत नसल्याने आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला नाही. याला केवळ अधीक्षक कार्यालयातील लिपिकवर्गीय यंत्रेणेचे वेळकाढू धोरण कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. यामुळे हक्काच्या घरासाठी पोलिसांना उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. अमरावती विभागातील उर्वरित चार जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘होम लोन’च्या अंतिम यादीत समावेश असताना यवतमाळातील एकही कर्मचारी का पात्र ठरला नाही, याची वरिष्ठांनी चौकशी करणे आवश्यक आहे. येथील बाबुगिरीला अभय मिळत असल्याने सामान्य पोलीस कर्मचाºयांची कुचंबणा होत आहे.‘होम लोन’च्या नादात आर्थिक फटकाडीजी होम लोनसाठी घर किंवा प्लॉट खरेदी केल्याची मूळप्रत सादर करावी लागते. यामुळे अनेक कर्मचारी खासगी होम फायनान्सचे कर्ज घेतात. ‘डीजी होम लोन’ मंजूर होताच ती रक्कम खासगी फायनान्सकडे जमा करता येईल, अशी त्यांना अपेक्षा असते. खासगी फायनान्सचे हप्ते भरून दैनंदिन खर्च भागविणे वेतनातून शक्य होत नाही. खासगी फायनान्सचे हप्ते अधिक असल्याने ही अडचण येते. मात्र डीजी होम लोन वेळेवर मिळत नसल्याने अनेक पोलीस कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत.होम लोनची यादी तयार करणे व मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया पोलीस अधीक्षक स्तरावरील आहे. यात नेमके काय झाले, याची चौकशी केली जाईल.- छगन वाकडेविशेष पोलीस महानिरीक्षकअमरावती विभाग