शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरीब नेत्ररूग्णांसाठी घरपोच तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:17 IST

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने नेत्ररोगाने त्रस्त असलेल्यांसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे. पोस्टकार्डने उपचाराची गरज असल्याचे सांगताच नेत्ररोगतज्ज्ञांची चमू थेट घरी पोहोचते.

ठळक मुद्दे‘मेडिकल’चे अभियान : २० हजार शस्त्रक्रियेचा संकल्प, आॅक्टोबरअखेर ३ हजार शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने नेत्ररोगाने त्रस्त असलेल्यांसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे. पोस्टकार्डने उपचाराची गरज असल्याचे सांगताच नेत्ररोगतज्ज्ञांची चमू थेट घरी पोहोचते. अशा १०९ जणांची तपासणी करून रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.नेत्ररोग विभागाने ग्रामीण भागातील गरीब रुग्णासाठी ‘घरपोच रुग्णसेवा अभियान’ सुरू केले आहे. वयोवृद्ध नेत्ररूग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोहोचत नाही. जुजबी उपचार केल्यास त्यांना चांगली दृष्टी प्राप्त होऊ शकते. मात्र अनेक मर्यादा असल्याने उतारवयात दृष्टीहीन म्हणून दिवस काढावे लागतात. यातच त्यांची आबाळ होते. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी नेत्ररोग तज्ज्ञांनीच थेट रुग्णाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी केवळ नेत्ररुग्ण असलेल्यांनी पोस्टकार्डवरून आपली माहिती ‘मेडिकल’ नेत्ररोग विभाग प्रमुखाच्या नावे पाठविणे आवश्यक आहे. आतापर्यंत १०९ जणांनी पोस्टकार्ड केले. यामध्ये घाटंजी येथील ६६ रुग्ण, वाई (लिंगी) येथील ८ रुग्ण, चिकणी (आर्णी) येथील ३७ रुग्णांची घरी जाऊन तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या उपचाराची दिशा निश्चित करून काहींवर मोतीबिंदू, काचबिंदू, पडदा आलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अभियानामुळे खेड्यापाड्यातील गरजू रुग्णांना घरपोच तपासणीचा लाभ मिळत आहे.आता मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानहा उपक्रम मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. सुधीर पेंडके यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे. आता मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र या अभियानातंर्गत वर्षभरात २० हजार नेस्त्ररुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत ३ हजार १३८ यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या अभियानाचा व घरपोच सेवेचा नेत्ररूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. सुधीर पेंडके यांनी केले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल