शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र रमजान पर्वात फुलली बाजारपेठ

By admin | Updated: June 16, 2017 01:43 IST

पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला असून यानिमित्त यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेठ फुलल्या आहे.

यवतमाळ : पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला असून यानिमित्त यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेठ फुलल्या आहे. विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. यवतमाळच्या कळंब चौकात करण्यात आलेली रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.रमजान हा संपूर्ण महिना पुण्याई आणि भरभराटीचा असतो. या महिन्यात रोजा करून अल्लाहाची आराधना केली जाते. या महिन्यात लैल तुलकद्र ही सौभाग्याची रात्र येते. रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात विषम संख्येच्या रात्री २१, २३, २५, २७ व २९ यापैकी एक रात्र असते. या रात्रीची तारीख निश्चितपणे न सांगण्यामागे उद्देश हाच की श्रद्धावंतांनी पाचही रात्री उपासना करावी. या रात्रीत अल्लाहकडून संपूर्ण मानव जातीसाठी दिव्य कुरआनचे अवतरण झाले. त्यामुळे रमजान महिन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या निमित्त शहरासह ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ शहरातील कळंब चौक परिसरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त बाजारपेठ सजली आहे. विविध खाद्यपदार्थ आणि साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. येथे रात्री खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. सुखामेवा, फळ, अत्तर, नमाजकरिता लागणाऱ्या टोप्या, फेण्या, कपडे येथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे बाहेरगावाहून येणारे प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी सहेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सहेरी कमेटीने पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून दररोज ६०० ते ७०० नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते.लखनौचे कारागिरयवतमाळच्या बाजारात विविध खाद्यपदार्थ तयार करून विकले जातात. त्यासाठी खास लखनौवरून फेणी तयार करणारे कारागिर आले आहे. या ठिकाणी फेण्यांचे विविध प्रकार दिसून येतात. ८० ते १०० रुपये किलोपर्यंत फेणी बाजारात उपलब्ध आहे.