शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात दारूची होळी

By admin | Updated: March 13, 2017 00:56 IST

जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने करणाऱ्या महिलांनी रविवारी होळीच्या दिवशी चक्क दारूचीच होळी केली.

दारूबंदीसाठी घोषणा : ‘बोल गं मावशी हल्लाबोल, या दारूवरती हल्लाबोल’ यवतमाळ : जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने करणाऱ्या महिलांनी रविवारी होळीच्या दिवशी चक्क दारूचीच होळी केली. या अभिनव आंदोलनात जिल्हाभरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. ‘बोल गं मावशी हल्लाबोल, या दारूवरती हल्लाबोल’, अशा घोषणांनी शासनाला जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वामिनी दारूमुक्त जिल्हा अभियानाच्या वतीने पोस्टल मैदानाजवळील तिरंगा चौकात हे अभिनव आंदोलन करण्यात आले. अभियानाचे जिल्हा संयोजक महेश पवार यांच्या पुढाकारात महिलांनी होळी उभारली. त्यात दारूच्या बॉटल टाकून होळी भडकवली. तंबाखू, गुटख्याच्या पुड्याही टाकण्यात आल्या. वाईट गोष्टी होळीत जाळून नष्ट करण्याची परंपरा आहे. दारू किंवा इतरही व्यसने संसार उद्ध्वस्त करीत आहे. त्यामुळे व्यसनांचा नायनाट करण्यासाठी दारूची होळी केल्याचे महेश पवार यांनी सांगितले. होळीसारख्या सणाला दारूचा महापूर वाहतो. दारू पाजून पैसे कमावणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत महामार्गालगतची सर्व दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, तसेच जिल्ह्यातील उर्वरित दारू दुकानेही सरकारने त्वरित बंद करावी, अशी मागणी स्वामिनीने केली आहे. या प्रसंगी मुख्य संयोजक महेश पवार, मनिषा काटे, बालाजी कदम, रवी पंचकोशी, मनोज राठोड, वर्षाताई निकम, पियूष गाब्राणी, भावना नव्हाते, विनोद देवतळे, शेखर सरकुटे, प्रशांत भोयर, महेश तिल्लारे, राजू राठोड, सपना श्रीकांत लोढम, दिनकरराव चौधरी, योगेश राठोड, किशोर नरांजे, सुषमा गाढवे, सीमा तेलंगे, राजू बुटे, सारीकास ताजणे, एकनाथ डगवार, भूदान यज्ञ मंडळाचे अशोक उमरतकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी) जोडमोहाच्या महिलेने पेटविली होळी जोडमोहा येथील जयमाला बोंद्रे या महिलेच्या हस्ते दारूची होळी पेटविण्यात आली. त्यांचा पती दारूच्या व्यसनामुळे अवघ्या १५ दिवसांपूर्वीच दगावला. दोन छोटी मुले पित्याला पारखी झाली. आपल्यासारखे कुणाच्याही संसाराला व्यसनाधीनतेचे चटके बसू नये, यासाठी आपण आंदोलनात सहभागी झाल्याचे जयमाला बोंद्रे म्हणाल्या.