शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

होळीतील घानमाकड झालीयं नामशेष

By admin | Updated: March 14, 2016 02:36 IST

होळीचा सण जवळ आला की, ग्रामीण भागात घानमाकडचा (कुरकुंजा) खेळ सुरू होतो.

ग्रामीण खेळ हरविले : चाकोल्या आणि पळस फुलाचा रंगही बेदखल प्रकाश सातघरे दिग्रसहोळीचा सण जवळ आला की, ग्रामीण भागात घानमाकडचा (कुरकुंजा) खेळ सुरू होतो. पळसाच्या वक्राकार लाकडापासून तयार केलेली घानमाकड पूर्वी खेड्यापाड्यातील मोकळ्या मैदानावर दिसायची. गोलाकार फिरणाऱ्या आणि कर-कर असा आवाज येणाऱ्या या घानमाकडीबद्दल बालकात विशेष आकर्षण असायचे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात बालपणीचे खेळ हरविले आणि घानमाकडही आता नामशेष झाली आहे.माग महिना संपताच फाल्गून महिन्याची सुरुवात होऊन होळीची चाहूल लागते. होळीच्या एक महिना अगोदरपासूनच तयारी सुरू होते. शेणापासून चाकोल्या तयार केल्या जातात. तसेच गावातील उत्साही मुले घानमाकड तयार करतात. गावालगतच्या जंगलात जाऊन पळसाचे वक्राकार लाकूड आणले जाते. लाकडाचा ओंडका जमिनीत गाढून त्याला टोक काढले जाते. त्या टोकावर वक्राकार लाकडाला मधोमध कोरुन ठेवले जाते आणि दोनही बाजूला मुलांना बसवून गोलगोल फिरविले जाते. घानमाकडीच्या खोल खाचेत कोळशाचे तुकडे फसविले जाते. धनुष्याच्या आकाराच्या लाकडावर संतुलन साधत गोलगोल फिरविले जाते. या घानमाकडीच्या खेळात लहान मुले दंग होतात. आज दुर्गम खेड्यामध्ये घानमाकड दिसत असले तरी शहरीकरणामुळे अनेक खेड्यातून ही घानमाकड आता नामशेष झाली आहे. २५ ते ३० वर्षापूर्वी हमखास दिसणारी घानमाकड आता दिसतच नाही. बालविश्वाचे सण-संस्कृतीशी नाते जोडणारी ही घानमाकड आता चित्रातच पाहावी लागते. यासोबतच होळीच्या सणापूर्वी लहान मुले शेणापासून चाकोल्या तयार करीत होते. चाकोल्या वाळू घालून त्याची हार बनवून होळीत टाकल्या जात होती. तसेच पळस फुलांपासून परंपरागत रंगही तयार केला जात होता. परंतु आता हा सर्व प्रकार मागे पडला आहे.