शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

पोलिसांना हाताशी धरा, भाड्याचे घर खाली करा

By admin | Updated: July 7, 2015 01:52 IST

नागरिकांचे संरक्षण व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा आता...

वडगाव रोडचा फंडा : डॉक्टरने दिली सुपारी, तीन गरीब कुटुंबांना बेघर करण्याचा डावयवतमाळ : नागरिकांचे संरक्षण व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा आता जणू अनधिकृत कामांच्या सुपाऱ्याही घेऊ लागली की काय, अशी शंका येऊ लागली आहे. कारण वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका डॉक्टरने पोलिसांना हाताशी धरुन घर खाली करण्यासाठी वापरलेला फंडा असाच संकेत देतो आहे. वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जुने घर आहे. त्याच घरात ट्रस्टमार्फत दवाखाना चालविला जात होता. मात्र काही वर्षांपूर्वी सदर डॉक्टर मुंबईत शिप्ट झाले. घर व दवाखान्याची इमारत शाबूत रहावी म्हणून त्यांनी समोरील तीन खोल्या तीन गरीब कुटुंबांना भाड्याने दिल्या. त्याच्या रीतसर भाडे पावत्याही देण्यात आल्या. मात्र आता डॉक्टरांना ती जुनी इमारत पाडून तेथे नवीन बांधकाम करायचे आहे. म्हणून त्यांनी हे घर खाली करून मागितले. अचानक आम्ही गरिबांनी घर सोडून कोठे जावे म्हणून त्या भाडेकरूंनी काही तरी मुदत द्या, अशी विनवणी केली. मात्र डॉक्टरने काही एक ऐकले नाही. उलट जानेवारी २०१५ मध्ये या तीनही गरीब कुटुंबांविरुद्ध वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांनी त्या तिघांना नोटीस बजावल्या. १६ जानेवारी रोजी हे कुटुंबीय भाडे चिठ्ठी व करारपत्रासह ठाण्यात गेले असता ठाणेदाराने त्यांनाच दमदाटी केली. ‘तुम्ही बुलडोजर आणा, या भाडेकऱ्यांचे घर पाडा, तेथे नवे बांधकाम करा, मी तुमच्या पाठीशी आहे’ अशा शब्दात डॉक्टरच्या पत्नीला पाठबळ दिले. म्हणून १७ जानेवारीला पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. डॉक्टर विरुद्ध भाडेकरी हा वाद सुरू असतानाच तेथे भाडेकरूचा मुलगा व डॉक्टरच्या मर्जीतील एका महिलेच्या मुलीचे प्रेमप्रकरण पुढे आले. ही तर डॉक्टरला सूड उगविण्याची आयतीच संधी चालून आली होती. म्हणून त्यांनी मुलीच्या आईला सोबत घेऊन षडयंत्र रचले. मुलीवर दबाव आणून भाडेकरूच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध अतिप्रसंगाची तक्रार नोंदविली गेली. खूद्द पोलिसच पाठिशी असल्याने २७ जून रोजी लगेच गुन्हाही दाखल केला गेला. यातील हा अल्पवयीन मुलगा अद्याप फरार आहे. मात्र त्याची मोलमजुरी करणारी आई व बहीण वडगाव रोड ठाण्यात गेल्या असता त्यांनाही आरोपी बनवून अटक केली गेली. आता उर्वरित दोन भाडेकरूंनाही डॉक्टर स्वत: आणि पोलिसांच्या मदतीने ‘तुमचाही काटा काढू’ असे सतत खडसावतो आहे. या संबंधी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे शनिवारी तक्रार नोंदविली गेली. इमारतीचा मालक असलेल्या डॉक्टरने तेथील वीज पुरवठा, पाणी पुरवठा बंद केला आहे. शौचालय तोडण्यात आले. कुठे आडोशाला भाडेकरूंना आंघोळ करता येऊ नये म्हणून व्हीडीओ कॅमेरे लावले गेले. फरार युवकाच्या घराचा दरवाजा पाडून तेथे रातोरात भिंत उभारली गेली. सदर प्रकरणाचा आता गाजावाजा होत असल्याने जानेवारी २०१५ मध्ये दिलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी पोलीस तब्बल सहा महिन्यानंतर म्हणजे शनिवारी ४ जुलै रोजी घटनास्थळी गेले. नागरिकांचे संरक्षण करणारे पोलीस स्वत:च बिल्डर व श्रीमंतांच्या हातातील बाहुले बनत असल्याचे, पैशासाठी गोरगरिबांची घरे खाली करण्याची अप्रत्यक्ष सुपारी घेत असल्याचे, अनधिकृत कारवाया करणाऱ्यांना पाठबळ देत असल्याचे उपरोक्त प्रकरणावरून स्पष्ट होते. वडगाव रोड पोलिसांच्या ‘कामगिरी’चे असे अनेक किस्से आहेत. एवढ्या भानगडी असूनही वडगाव रोड ठाणेदाराची बदली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांचा गॉडफादर राजकीय की प्रशासकीय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जानेवारीत दिलेल्या तक्रारीचा चक्क जुलैमध्ये पंचनामाया प्रकरणाचा आता गाजावाजा होत असल्याने जानेवारी २०१५ मध्ये दिलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी पोलीस तब्बल सहा महिन्यानंतर म्हणजे शनिवारी ४ जुलै रोजी घटनास्थळी गेले होते. आता त्यांनी पंचनामा व चौकशीचा देखावा निर्माण केला आहे.वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. पाठोपाठ भरदिवसा घरफोड्या होत आहे. नागरिकांचा लाखोंचा ऐवज लुटून नेला जात आहे. चोरीचे हे गुन्हे रोखणे व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याऐवजी वडगाव रोड पोलीस लोकांची घरे खाली करून घेण्यात ‘इन्टरेस्ट’ घेत आहे.