शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अपत्यासाठी पत्नीला केले मित्राच्या स्वाधीन

By admin | Updated: November 1, 2014 01:11 IST

लग्नाला पाच वर्ष होऊनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने एका पतीने माणुसकीला काळीमा फासण्याचा निंदनीय कृत्य केले.

यवतमाळ : लग्नाला पाच वर्ष होऊनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने एका पतीने माणुसकीला काळीमा फासण्याचा निंदनीय कृत्य केले. अपत्यप्राप्तीच्या नादात त्याने चक्क आपल्या पत्नीलाच मित्राच्या स्वाधीन केले. ही समाजमन सुन्न करणारी घटना यवतमाळ तालुक्यातील जांब येथे घडली. पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राला अटक केली.रामप्रसाद रा. जांब असे पतीचे तर विजय कोडापे रा. जांब असे त्याच्या मित्राचे नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एका तरूणीशी रामप्रसादचा पाच वर्षापूर्वी रीतिरिवाजाने विवाह झाला. मात्र त्याला अपत्यप्राप्ती झाली नाही. अपत्य होत नसल्याने त्याने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने चक्क मित्र विजय कोडापे याच्या घरी नेऊन तिला अपत्यासाठी त्याच्या स्वाधीन केले. या घृणास्पद कृत्यासाठी तिची सहमती नसताना संबंधित दोघांनीही संगनमताने बळजबरी केली. घटनेनंतर पीडित विवाहितेने थेट माहेर गाठले. तसेच नातेवाईकांकडे आपबीती कथन केली. त्यावरून नातेवाईकांनी पीडित मुलीसह देवळी पोलीस ठाणे गाठले तसेच याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून देवळी पोलिसांनी पती रामप्रसाद आणि त्याचा मित्र विजय कोडापे याच्याविरूद्घ झिरोवर भादंवि ३७६ (ग) कलमान्वये बलात्काराचा गुन्हा नोंदविला. तसेच घटना जांब येथील असल्याने हा गुन्हा हद्द असलेल्या यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला. त्यावरून पोलिसांनी या गुन्ह्याची कायमी करून संबंधित दोघांनाही गुरूवारी दुपारी राहत्या घरून अटक केली. या घटनेने जांबसह लगतच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)